भाईजान मेहरबान! ‘दबंग 3’मध्ये बॉबी देओलची वर्णी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 10:43 AM2019-02-20T10:43:24+5:302019-02-20T10:47:04+5:30

‘रेस 3’नंतर पुन्हा एकदा भाईजान सलमान खान बॉबी देओलवर  मेहरबान झालेला दिसतोय. होय, भाईजानच्य ‘दबंग 3’ या चित्रपटात बॉबी देओलची वर्णी लागल्याची खबर आहे.

bobby deol gets entry in salman khans dabangg 3 | भाईजान मेहरबान! ‘दबंग 3’मध्ये बॉबी देओलची वर्णी!!

भाईजान मेहरबान! ‘दबंग 3’मध्ये बॉबी देओलची वर्णी!!

ठळक मुद्दे ‘भारत’ संपल्यानंतर लगेच भाईजान ‘दबंग 3’चे शूटींग सुरु करणार आहे.

‘रेस 3’नंतर पुन्हा एकदा भाईजान सलमान खानबॉबी देओलवर  मेहरबान झालेला दिसतोय. होय, भाईजानच्य ‘दबंग 3’ या चित्रपटात बॉबी देओलची वर्णी लागल्याची खबर आहे.
बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, ‘दबंग 3’मध्ये बॉबी सलमानच्या मित्राची भूमिका साकारताना दिसणार आहे. चित्रपटात चुलबुल पांडेच्या तारूण्याचे दिवस फ्लॅशबॅकमध्ये दाखवण्यात येणार आहेत. या फ्लॅशबॅकमध्ये चुलबुल पांडेच्या मित्राची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ही भूमिका बॉबी साकारणार आहे.


यापूर्वी भाईजानच्या ‘रेस 3’मध्ये बॉब दिसला होता. बॉबीचे करिअर संपले, असे वाटत असताना सलमानने त्याला  ‘रेस 3’मध्ये कास्ट करून मदतीचा हात दिला होता. या चित्रपटासाठी  घेतलेली मेहनत,  बनवलेली बॉडी या सगळ्यांचा फायदा बॉबीला झाला. ‘रेस 3’नंतर बॉबीचे फॅन फॉलोर्इंग वाढले. अनेक इव्हेंटमध्ये तो दिसू लागला आहे.     ग्लॅमर वर्ल्डनेही बॉबीची दखल घेतली आहे. सलमान खानमुळेचं बॉबीला ‘रेस 3’ हा चित्रपट मिळाला. एकंदर काय तर सलमानने बॉबीला इंडस्ट्रीत नव्याने जागा मिळवून दिली. आता सलमानने पुन्हा एकदा ‘दबंग 3’मध्ये बॉबीला कास्ट करून मदतीचा हात देऊ केला आहे.  


सलमान सध्या ‘भारत’ या चित्रपटात बिझी आहे. येत्या जूनमध्ये ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘भारत’ संपल्यानंतर लगेच भाईजान ‘दबंग 3’चे शूटींग सुरु करणार आहे. २०१० मध्ये ‘दबंग ’ प्रदर्शित झाला होता. यानंतर २०१२ मध्ये ‘दबंग 2’ने बॉक्सआॅफिसवर धूम केली होती. सलमान व सोनाक्षीची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. गतवर्षी ‘दबंग’ला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर सलमानने ‘दबंग 3’ची घोषणा केली होती.

Web Title: bobby deol gets entry in salman khans dabangg 3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.