दाक्षिणात्य अभिनेत्री काजल अग्रवाल हिचा आज (१९जून) वाढदिवस. १९ जून १९८५ रोजी काजलचा जन्म झाला. आज काजल ३३ वर्षांची झाली आहे. खरे तर काजलने २००४ मध्ये बॉलिवूड डेब्यू केला. पण या इंडस्ट्रीत खरी ओळख मिळवण्यासाठी तिला २०११ पर्यंत प्रतीक्षा करावी लागली. ‘क्यों हो गया ना’ या बॉलिवूड चित्रपटातून तिने डेब्यू केला होता. पण २०११ मध्ये आलेल्या ‘सिंघम’ या चित्रपटाने तिला खरी ओळख दिली.  त्यानंतर काजलने ‘स्पेशल२६’ या चित्रपटातही काम केले. ‘दो लफ्जो की कहानी‘ या चित्रपटातही ती दिसली. पण यानंतर तिने आपला मोर्चा पुन्हा साऊथकडे वळवला.  

 

आज काजलने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत चांगलाच जम बसवला आहे. २००७ मध्ये तिने एका तेलगू चित्रपटातून डेब्यू केला होता. २००९ मध्ये आलेल्या ‘मगधीरा’ या चित्रपटानंतर ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जावू लागली. तुम्हाला ठाऊक नसेल पण काजल मुळची मुंबईची आहे.
काजलने सेंट एनी शाळेतून शिक्षण पूर्ण केले आहे, मुंबईतील सर्वात टॉप स्कुलमध्ये ते गणले जाते. त्यानंतर काजलने मुंबई येथील केसी कॉलेजमधून मास मीडियाचे शिक्षण घेतले . कॉलेजमध्ये असतानाच तिने तिला मॉडेलिंग करायचे असल्याचे ठरवले होते.  फायनल ईअरपर्यंत काजल  मॉडेलिंगच्या दुनियेत स्थिरावली होती. यादरम्यान ‘क्यों हो गया ना’मध्ये दिसली. यात ती दीया मिर्झाच्या मैत्रिणीच्या भूमिकेत होती. यानंतर तिने दिग्दर्शक तेजा यांचा चित्रपट ‘लक्ष्मी कलयाणम’मधून कल्याण राम या अभिनेत्यासोबत तेलुगू चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.  ‘दो लफ्जों की कहानी’ या चित्रपटात काजल लीड भूमिकेत होती. पण या चित्रपटामुळे काजल अचानक चर्चेत आली होती. यात तिच्या अपोझिट रणदीप हुड्डा होता़ एका रोमॅन्टिक सीनचे शूटींग सुरू असताना रणदीपने अचानक काजलला किस केला होता. काजल यामुळे प्रचंड भडकली होती. कारण किसींग सीन असल्याचे तिला सांगण्यात आले नव्हते़. यानंतर मेकर्सने अनेक मनधरणी केल्यानंतर कुठे ती मानली होती.ALSO READ : काजल अग्रवालच्या मॅनेजरला ड्रग्ज प्रकरणात अटक; काजलने म्हटले अटक योग्यच!

काजलने एफएचएम मॅगझिनसाठी  फोटोशूट केले होते. पण नंतर या मॅगझिनने काजलचा टॉपलेस फोटो कव्हरपेजवर छापला. या फोटावरून मोठा वाद झाला होता. मी असे कुठलेही टॉपलेस फोटोशूट केलेच नाही, असे काजलचे म्हणणे होते.
Web Title: Birthday Special: Topless photos and 'those' some scenes were discussed by Kajal Agarwal !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.