बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता शेखर कपूर याचा आज(६ डिसेंबर) वाढदिवस. ६ डिसेंबर १९४५ रोजी लाहोरमध्ये शेखर कपूरचा जन्म झाला. शेखर कपूर हा सदाबहार अभिनेता देवानंदचा भाचा आहे, हे कदाचित तुम्हाला ठाऊक असेलच. देवआनंद यांची बहीण शीलकांता हिचा शेखर कपूर हा मुलगा. हिंदी चित्रपटसृष्टीत शेखर कपूर हे आजघडीला एक मोठे नाव आहे. ‘मासूम’,‘बँडिट क्विन’,‘एलिझाबेथ’,‘मिस्टर इंडिया’ सारखे एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट साकारणा-या या दिग्दर्शकाचे खासगी आयुष्य मात्र अनेक वादांनी भरलेले राहिले आहे.फार कमी लोकांना ठाऊक असेल की, केवळ वयाच्या २२ व्या वर्षी शेखर कपरू ब्रिटनच्या आयसीएईडब्ल्यूमधून चार्टर्ड अकाऊंटंट बनला. पालकांच्या इच्छेखातर शेखर सीए बनला. यानंतर एका मल्टिनॅशनल आॅईल कंपनीत त्याला नोकरी मिळाली. पण शेखरचे मन तिथे फार काळ रमले नाही. १९७५ मध्ये ‘जान हाजिर है’ या चित्रपटाद्वारे त्याने आपले फिल्मी करिअर सुरु केले. अर्थात अभिनेता म्हणून तो अपयशी ठरला. मग त्याने दिग्दर्शनात नशीब आजमवायचे ठरवले.शेखर कपूर यांनी दोन लग्न केलीत. पण ही दोन्ही लग्नं अपयशी ठरलीत.  माजी पंतप्रधान आय. के. गुजराल यांची पुतणी मेधा गुजराज ही शेखर कपूरची पहिली पत्नी. पण १९९४ मध्ये शेखर व मेधा यांचा घटस्फोट झाला.मेधानंतर शेखरच्या आयुष्यात अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती आली. तिच्यासोबत शेखरने दुसरे लग्न केले. अर्थात १९९७ मध्ये हे नातेही तुटले. दोघांचीही कावेरी नावाची एक मुलगी आहे. अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीने या घटस्फोटासाठी अभिनेत्री प्रीती झिंटा हिला जबाबदार ठरवले होते.   प्रीतीला ‘मॅनईटर’ असल्याचे सुचित्राने म्हटले होते. अर्थात प्रीतीने हे आरोप फेटाळले होते. शेखर कायम माझ्यासाठी खास राहतील. त्यांनीच मला इंडस्ट्रीत आणले. माझ्यावरचे आरोप दुर्दैवी आहेत. सुचित्राची मानसिक स्थिती ठिक नाही, असे प्रीती म्हणाली होती.ALSO READ : कंगना राणौतसाठी लिहिली जातेय, खास कथा! वाचा संपूर्ण बातमी!!

कधीकाळी शेखर कपूर व शबाना आझमी यांच्या अफेअरची चर्चाही बॉलिवूडमध्ये रंगली होती. ‘इश्क इश्क इश्क’च्या सेटवर या दोघांचीही भेट झाली होती. हळूहळू दोघांचेही प्रेम बहरले. अर्थात सात वर्षांच्या रिलेशननंतर दोघेही वेगळे झालेत. ब्रेकअपनंतरही शबानाने शेखर दिग्दर्शित ‘मासूम’ या पहिल्या चित्रपटात काम केले होते.
Web Title: Birthday Special: Shekhar Kapoor's second wedding!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.