करिश्मा कपूर हिचा आज (25 जून)वाढदिवस़ करिश्मा आज बॉलिवूडच्या चित्रपटात कुठेही नाही. पण बॉलिवूड गँगसोबतचे तिचे बॉन्डिंग अगदी घट्ट आहे. त्यामुळे बॉलिवूडच्या अनेक पार्ट्यांना ती असतेच असते. कपूर घराण्यात जन्मलेल्या करिश्माने १९९१ मध्ये ‘प्रेम कैदी’ नामक चित्रपटातून आपल्या करिअरची सुरूवात केली होती.‘प्रेम कैदी’ रिलीज झाला तेव्हा लोकांनी करिश्माची बरीच खिल्ली उडवली होती. कुणी तिला लेडी रणधीर म्हणून बोलवले होते तर कुणी माणसासारखी दिसणारी महिला म्हणून तिला हिणवले होते. पण १९९६ मध्ये आलेल्या ‘राजा हिंदुस्तानी’ने करिश्माचा फासा पलटवला. यात तिचा पूर्ण मेकओव्हर झालेला दिसला. या चित्रपटात आमिरसोबत तिने दिलेला लिपलॉक सीनही तिच्या चर्चेला कारणीभूत ठरला. करिश्मा व आमिरने दिलेला हा किसींग सीन सगळ्यांत मोठा मानला गेला होता.कपूर घराणे हे बॉलिवूडचे सगळ्यांत मोठे घराणे. राजकपूर, शम्मी कपूर, शशी कपूर,ऋषी कपूर आणि वडिल रणधीर कपूर यांच्यासारखेचं करिश्माचेही करिअर शानदार राहिले. तिने आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. राजा बाबू, कुली नंबर1, साजन चले ससुराल, जीत ,राजा हिंदुस्तानी, दिल तो पागल है, हिरो नंबर1, बीबी नंबर1 अशा अनेक यशस्वी चित्रपटात तिने काम केले.करिश्माला घरी सगळे जण लोलो नावाने ओळखता. हॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री गिना लोलोब्रिगिडा हिच्या नावावरून करिश्माच्या आईने तिला हे नाव दिले होते.2002 मध्ये करिश्माने अभिषेक बच्चनसोबत साखरपुडा केला. पण हा साखरपुडा तुटलाही. अभिषेकच्या पहिल्या चित्रपटात करिश्माची लहान बहीण करिना हिरोईन होती. करिना अभिषेकला जीजू म्हणूनच हाक मारायची. अमिताभ यांनी आपल्या ६० व्या वाढदिवशी करिश्मा व अभिषेक यांच्या साखरपुड्याची घोषणा केली आणि सगळ्या जगापुढे या नात्याचा खुलासा झाला. पण यानंतर असे काही  झाले की, हे लग्न मोडले. करिश्माची आई बबीता हिला अभिषेक फारसा आवडत नव्हता. या काळात अभिषेकचे सगळे चित्रपट फ्लॉप गेलेत. याऊलट करिश्मा त्याकाळातील सुपरहिट हिरोईन होती. अभिषेक अपयशी ठरला तर काय, याची बबीता यांना भीती होती. आईच्या या भीतीपोटी करिश्मा मागे हटली व तिने हा साखरपुडा तोडला, असे म्हटले जाते.2003 मध्ये करिश्माने संजय कपूरसोबत लग्न केले. पण हे नातेही टिकले नाही आणि करिश्माने संजयपासून घटस्फोट घेतला. या दोघांना दोन मुले आहेत.
तूर्तास लोलोचे नाव बिझनेसमॅन संदीप तोष्णीवालसोबत जोडले जात आहे. ते लग्न करणार अशीही चर्चा आहे. पण अलीकडे रणधीर कपूर यांनी या चर्चेचे खंडन केले होते. करिश्मा दुसºया लग्नाच्या मूडमध्ये अजिबात नाही, असे त्यांनी म्हटले होते.

ALSO READ : ​आमिर खानने 22 वर्षानंतर सांगितली त्या ‘किसींग सीन’च्या पडद्यामागची कहाणी!
Web Title: Birthday special: People of Karema Kapoor's 'Lady Randhir Kapur'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.