‘रॉकस्टार’मधून बॉलिवूड डेब्यू करणारी अभिनेत्री नर्गिस फखरी हिचा आज (२० आॅक्टोबर) वाढदिवस. वाढदिवसानिमित्त जाणून घेऊ या तिच्या आयुष्याबद्दलच्या काही खास गोष्टी.
नर्गिसने सायकॉलॉजी आणि फाईन आटर्समध्ये पदवी मिळवली आहे. खरे तर नर्गिसला शिक्षणात अजिबात रस नव्हता. अभ्यासाचा तिला जाम कंटाळा यायचा. केवळ आई रागावते म्हणून ती अभ्यास करायची.  लहानपणापासून मॉडेलिंग करायचे हे नर्गिसने ठरवून टाकले होते. २००५ मध्ये तिने मॉडेलिंगच्या दुनियेत पाऊल ठेवले.अनेक संघर्षांनंतर नर्गिसने मॉडेलिंगमध्ये आपली जागा बनवली. नर्गिसला ट्रॅव्हल करणे खूप आवडते. ती बहुतांश जग फिरली आहे. न्यूयॉर्कमध्ये तिचा जन्म झाला. नर्गिसच्या वयाच्या सातव्या वर्षी तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. नर्गिसची आई मेरी चेक ही ख्रिश्चन आहे तर तिचे वडिल मोहम्मद फखरी पाकिस्तानी आहेत.मॉडेलिंगच्या दिवसात नर्गिस एका मुलाच्या प्रेमात आंकठ बुडाली होती. तो आणि ती एका नाईट क्लबमध्ये भेटले होते. सहा महिन्याच्या डेटींगनंतर दोघेही प्रेमात पडले होते. यानंतर त्या मुलाने नर्गिसच्या आईसमोर नर्गिससोबत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली होती. पण नर्गिसची आई राजी झाली नाही. आधी आयुष्यात काही कर आणि मग लग्न कर, हे नर्गिसच्या आईने तिच्या गळी उतरवले. यानंतर नर्गिस घराबाहेर पडली अन् बॉलिवूडची स्टार बनली.‘रॉकस्टार’ करण्याआधी नर्गिसने  बॉलिवूड सिनेमे पाहिले नव्हते. तिला हिंदीही येत नव्हती. हिंदी शिकवण्यासाठी तिने बरीच मेहनत घेतली.आता लग्नाबद्दल नर्गिसचे ठाम मत आहे. लग्न गरजेचे नाही. मी एक स्वतंत्र व्यक्ती आहे. स्वत: कमवते आणि जगते, असे ती म्हणत. मी आयुष्यात अनेक दु:खी विवाहित जोडपे पाहिले आहेत, असे ती म्हणते.ALSO READ: ​नर्गिस फखरी अन् उदय चोप्रा यांच्यात नाही काहीही ठीक! हा घ्या पुरावा!!

उदय चोप्रासोबत नर्गिस रिलेशनशिपमध्ये होती, असे मानले जाते. अर्थात नर्गिसने यास कधीही दुजोरा दिला नाही. गतवर्षी दोघांचे ब्रेकअप झाल्याची बातमी आली होती. यामुळे नर्गिस डिप्रेशनमध्ये गेल्याचेही कानावर आले होते. अर्थात नर्गिसने हे वृत्त नाकारले होते. शिवाय उदय व ती रिलेशनशिपमध्ये आहे, याचेही तिने खंडन केले होते. पण यानंतर सुमारे वर्षभरानंतर दोघेही एकत्र विमानतळावर दिसले होते. जगाच्या पाठीवर उदय चोप्रा इतका चांगला व्यक्ती मला भेटलेला नाही. उदय ज्याच्या कुणाच्या आयुष्यात असेल, ते त्याचे नशीब,असे मी म्हणेल. तो माझ्या आयुष्याचा भाग आहे आणि राहिल, असे नर्गिस एका मुलाखतीत म्हणाली होती. 
Web Title: Birthday special: Nargis Fakhri left for her career to tell her mother!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.