बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याचा आज (१४ मार्च) वाढदिवस. १४ मार्च १९६५ रोजी मुंबईत आमिरचा जन्म झाला.   तुम्हाला कदाचित माहित नसेल की, आमिर खानचे पूर्ण नाव मोहम्मद आमिर हुसैन खान. मात्र आमिर खान बॉलिवूडमध्ये आमिर याच नावाने लोकप्रिय आहे. आमिर खानने वयाच्या ८ व्या वर्षी ‘यादों की बारात’ या सिनेमांत बालकलाकार म्हणून पहिलं काम केलं आणि पुढे बॉलिवूड हीच आमिरची कर्मभूमी झाली.आमिरबद्दल आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे, आमिर खान लहानपणी गर्ल्स स्कूलमध्ये शिकला. त्या शाळेत ५ वीपर्यंत मुलं देखील शिकू शकत होते. कदाचित हेच कारण आहे की, आमिर खानचे मित्र कमी असून मैत्रिणी जास्त आहेत.आमिरच्या पहिल्या प्रेमाबद्दल काय सांगावे. आमिरची पहिली गर्लफ्रेन्ड होती रीना दत्ता. तिच्या प्रेमात आमिर आकंठ बुडाला होता. पण दोन्ही कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. आमिर तर रीनाशिवाय राहण्याची कल्पनाही करू शकत नव्हता. मग काय, कुणालाही खबर न होऊ देता अगदी गुपचूप आमिर खानने २१ वर्षांचा झाल्यावर   रिनासोबत लग्न केलं. त्याने  लग्न केलं तेव्हा त्याचा ‘कयामत से कयामत तक’ हा सिनेमा प्रदर्शित होणार होता. आमिरने बराच काळ लग्नाची बातमी घरच्यांपासून लपवून ठवेली. पण कालांतराने आमिरच्या कुटुंबाने रीनाचा स्वीकार केला. पण काहीच वर्षांत आमिर व रिनाच्या नात्यात दरी निर्माण झाली.आमिर व प्रीती झिंटा ‘दिल चाहता है’मध्ये काम करत होते. यादरम्यान दोघांच्या अफेअरच्या चर्चा जोरात होत्या. याच चर्चेमुळे आमिर व रीना यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. पण पाणी डोक्यावर जातेय, हे प्रीतीच्या लक्षात आले आणि   वेळीच असे काहीही नसल्याचे प्रीतीने स्पष्ट केले. यानंतर आमिर व रीना यांच्यात सगळे काही ठीक झाले. पण लगेच आमिरचे नाव किरण रावसोबत जोडले जाऊ लागले.सन 2002 मध्ये ‘लगान’च्या शूटदरम्यान आमिर व किरण पहिल्यांदा एकमेकांना भेटले. आमिर विवाहीत होता पण किरणची हुशारी पाहून तो तिच्यावर कमालीचा भाळला. या चित्रपटात किरण शामिन देसाई यांची असिस्टंट होती. पुढे किरणही आमिरच्या प्रेमात पडली आणि दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. 2002 मध्ये आमिरने रीनाला घटस्फोट दिला आणि 2005 मध्ये आमिरने किरणसोबत दुसरा संसार थाटला.  आमिर खानची पत्नी किरण रावच्या मते आमिरला ईटिंग डिसआॅर्डर असून त्याला आंघोळ करण्याचा प्रचंड कंटाळा आहे.  ALSO READ : तीन अब्ज प्रेक्षकांचा फेव्हरेट बनला आमिर खान, पण कसा? वाचा सविस्तर!


आमिरच्या आजवरच्या कारकिर्दीत त्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आले. ब्रिटेनच्या जेसिका नावाच्या महिला पत्रकारासोबत त्याचे प्रेमसंबंध असल्याच्या बातम्या एका मासिकाने दिल्या होत्या. या मासिकानुसार ‘गुलाम’ या चित्रपटाच्या सेटवर आमिर आणि जेसिकाची ओळख झाली होती आणि ते दोघे लिव्ह इन मध्ये राहायला लागले होते. जेसिकाला दिवस गेल्यानंतर गर्भपात करण्यासाठी आमिरने दबाव टाकल्याचाही दावा या मासिकाने केला होता. या मासिकानुसार, जेसिकाने आमिरच्या मुलाला जन्म दिला असून ती तिच्या या मुलासमवेत लंडनमध्ये राहाते.
  
Web Title: Birthday Special: - Aamir Khan's first love for Kiran Rao!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.