Bigg Boss 11: Zubair Khan falls on Dabang Khan! Salman Khan should apologize for me! | Bigg Boss 11 : ​जुबैर खान पडला ‘दबंग खान’वर भारी! म्हणे, सलमान खानने माझी माफी मागावी !!

जुबैर खान ‘बिग बॉस11’मधून आऊट झालायं. पण भले भले टाळतात,ते जुबैरने केलेयं. होय, त्याने सलमान खानशी पंगा घेतलायं. पहिल्याच आठवड्यात जुबैर सलमानच्या रडावर आला आणि मग सलमानने कुठलीही पर्वा न करता, जुबैरचा जाहिर क्लास घेतला. नॅशनल टीव्ही सलमानकडून अशी नाचक्की झाल्याने जुबैरचे संतुलन ढळले आणि त्याच रात्री म्हणे त्याने झोपेच्या गोळ्या खावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ‘बिग बॉस11’च्या घरातील हे कांड जगजाहिर झाले आणि पाठोपाठ सलमानविरोधात एफआयआर दाखल करत जुबैर मैदानात उतरला.  ‘तुला घाबरायला मी विवेक ओबेरॉय नाही, कुठे भेटू सांग,’अशा शब्दांत त्याने सलमानला आव्हान दिले. केवळ इतकेच नाही तर सलमान खानबद्दल धक्कादायक खुलासे करणारा एक व्हिडिओही जारी केला. ‘मला बिग बॉसच्या घरातून काढले गेलेले नाही, तर मी स्वत:हून बाहेर आलो आहे. कारण बिग बॉसच्या घरात सगळेच चुकीचे घडतेयं. मी त्याविरोधात आवाज उठविला. ज्यांच्यात दम नाही ते शांत आहेत. कारण ते सलमानला घाबरतात,’असे त्याने या व्हिडिओत म्हटले आहे.

आता जुबैरने त्या पुढची मागणी केली आहे. होय, सलमानने माझी जाहिर माफी मागावी, अशी मागणी जुबैरने पुढे रेटली आहे. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत जुबैरने ही मागणी केली. ‘मी बिग बॉसच्या घरातून निघाल्यावर कलर्स वाहिनीने मला लगेच शोमध्ये परतण्याचा प्रस्ताव दिली. पण सलमानने मला माफी मागावी. तरच मी शोमध्ये परतेल, असे मी त्यांना सांगितले. मी माझा स्वाभिमान विकलेला नाही. सलमान जे काही बोलला, ते माझा स्वाभिमान दुखावणारे आहे आणि त्यामुळेच त्याने माझी माफी मागायलाच हवी. मी सलमानविरोधात तक्रार दाखल केली आहे. आता मला कलर्सकडून न्याय हवा आहे. त्यांनी माझ्या नावाचा गैरवापर केला,’असे जुबैरने या मुलाखतीत म्हटले.
आता जुबैरची मागणी मानून सलमान त्याची माफी मागतो की नाही, हे पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण या संपूर्ण प्रकरणात कोण बरोबर अन् कोण चूक, याबद्दल तुम्हाला काय वाटतेय, ते आम्हाला कळवायला विसरू नका!!

ALSO READ : Bigg Boss 11 : जुबेर खानने शेअर केला व्हिडीओ; सलमान खानबद्दलचे खुलासे ऐकून तुम्हाला धक्का बसेल!
 
Web Title: Bigg Boss 11: Zubair Khan falls on Dabang Khan! Salman Khan should apologize for me!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.