Big blow to Akshay Kumar; Against the screening of this film made in 450 crores again! | अक्षयकुमारला मोठा धक्का; ४५० कोटींमध्ये बनविलेल्या ‘या’ चित्रपटाच्या प्रदर्शनात पुन्हा अडथळा !

सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘काला’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे; मात्र अशातही चित्रपटाचे कलेक्शन अपेक्षापेक्षा कमीच ठरले आहे. रजनीकांत यांच्या ‘काला’नंतर आता त्यांच्या आगामी ‘२.०’ या चित्रपटाची प्रतीक्षा लागली आहे. या चित्रपटात रजनीकांत यांना टक्कर देण्यासाठी बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार खलनायकाच्या भूमिकेत आहे; मात्र रजनी आणि अक्षयमधील ही टक्कर प्रेक्षकांना केव्हा बघावयास मिळेल हे अजूनही गुलदस्त्यात आहे. आता येत असलेल्या माहितीनुसार, प्रेक्षकांना आणखी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘२.०’ या वर्षी प्रदर्शित होणार नाही; मात्र अद्यापपर्यंत याविषयी कुठलेही अधिकृत वृत्त समोर आले नाही; परंतु ज्यापद्धतीने मीडियामध्ये बातम्या येत आहेत, त्यावरून रजनीकांत आणि अक्षयकुमारचा सामना बघण्यासाठी प्रेक्षकांना आणखी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, चित्रपटाच्या प्रदर्शनाला विलंब होण्यामागचे कारण वीएफएक्सवर  (ग्राफिक्स) सुरू असलेले काम आहे. सध्या ग्राफिक्सवर ओव्हरनाइट आणि डबल शिफ्टमध्ये काम केले जात आहे; मात्र अशातही निर्मात्यांना हे काम लवकर पूर्ण होईल असे वाटत नाही. त्यामुळेच हा चित्रपट पुढच्यावर्षी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. बॉलिवूड हंगामाच्या सूत्रांना मिळालेल्या माहितीनुसार, ज्या पद्धतीचे वीएफएक्सचे काम २.० मध्ये आहे, ते अजूनही पेंडिंग आहे. त्यामुळे निर्मात्यांकडे हा चित्रपट प्रदर्शित न करणे हा एकमेव पर्याय आहे. कदाचित यावर्षी वीएफएक्सचे काम पूर्ण करून मेकर्स पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित करू शकतात; मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनाविषयी अद्यापपर्यंत कुठलीही माहिती अधिकृतरीत्या स्पष्ट केले नसल्याने चाहते चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहेत. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘या वर्षाच्या अखेरपर्यंत ‘२.०’चे निर्माते वीएफएक्सचे अधिकाधिक काम पूर्ण करणार आहेत; मात्र चित्रपटाच्या प्रदर्शनात सातत्याने वाढ होत असल्याने त्याच्या बजेटमध्येही वाढ होत आहे. ज्यामुळे निर्मात्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या माहितीसाठी या चित्रपटाचे बजेट सुमारे ४५० कोटी रुपये इतके आहे. 
Web Title: Big blow to Akshay Kumar; Against the screening of this film made in 450 crores again!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.