A big banner movie that took place in 'Woman' | 'राजी'नंतर विक्की कौशलच्या हाती लागला एक मोठ्या बॅनरचा चित्रपट

राजी चित्रपट हा अभिनेता विक्की कौशलच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. नुकताच आलिया भट्ट आणि विक्की कौशलच्या 'राजी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमावला. ऐवढेच नाही तर दोघांच्या अभिनयाचे कौतुकदेखील समीक्षकांबरोबर प्रेक्षकांनी ही केले. विक्की कौशलच्या फॅन्ससाठी एक खूशखबर आहे. 

राजीनंतर विक्की आपल्याला राजकुमार हिरानी यांच्या 'संजू' चित्रपटात. संजय दत्तचा मित्र कुमार गौरवची भूमिका साकारताना दिसणार आहे. 'संजू'नंतर आणखीन एक विक्कीच्या हाती लागला आहे. मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार विक्की कौशल लवकरच आपल्याला करण जोहरच्या चित्रपटात दिसणार आहे. धर्मा प्रॉडक्शन अंतर्गत तयार होणाऱ्या चित्रपटासाठी विक्कीला कास्ट करण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन भानु प्रताप सिंग करणार आहे. भानूने धडक चित्रपटाचे ही दिग्दर्शन केले आहे. हा एक हॉरर चित्रपट असणार आहे. यात विक्की कौशल मुख्य भूमिका साकारणार आहे. धर्मा प्रोडक्शन अंतर्गत विक्कीचा हा दुसरा चित्रपट असणार आहे. 

विक्की कौशलने याआधी मसान आणि रमन राघव सारख्या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशलने लव्ह शव्ह ते चिकन खुराणा या चित्रपटापासून त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली. मात्र तो प्रकाश झोतात आला तर मेघना गुलजार दिग्दर्शित राजी चित्रपटानंतर. हा चित्रपट हरिंदर सिक्का यांच्या कॉलिंग सहमत या कांदबरीवर आधारित आहे. या पाकिस्तानी अधिकाऱ्याची भूमिका विक्की कौशल साकारतो आहे. या चित्रपटात आलियाने एका गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. सहमतचे वडील तिचे लग्न पाकिस्तानच्या एका अधिका-याची लावून देतात. हा पाकिस्तानी अधिकारी विक्की कौशल असतो. त्यांना या चित्रपटात केलेला अभिनय प्रेक्षकांना खूपच भावलाय.  
Web Title: A big banner movie that took place in 'Woman'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.