Big B beat tweet! | बिग बींनी ट्विटरला मारला टोमणा!

महानायक अमिताभ बच्चन फेसबुकवर 30 दशलक्ष फोलोवर्ससह भारतीय फिल्म इंडस्ट्रीतले 'मोस्ट एंगेंजिंग सेलिब्रिटी ऑन फेसबुक' बनले आहेत. बिग बींनी स्कोअर ट्रेड्स इंडियाद्वारे दिलेल्या ह्या माहितीची पुष्टी ट्विटवरून दिली आहे. बिग बींच्या एका चाहतीने स्कोर ट्रेन्ड्स इंडियाच्या चार्टची आकडेवारी ट्विट केली होती. अमिताभ बच्चन ह्यांनी ती रिट्विट करत ट्विटरला शाल जोडीतला आहेर देत म्हटले आहे, "होय, ट्विटर आता तुम्ही ह्याला स्विकृती द्याल का "

रिपोर्ट्सच्या अनुसार, ट्विटरने अचानक बिग बीच्या फॉलोवर्सची संख्या 60,000 पर्यंत कमी केली होती. त्यामुळे ते तिसऱ्या क्रमांकावर आला होते आणि शाहरुख खान 3,29,41,837 फॉलोवर्ससह दुसऱ्या स्थानी पोहोचला होता. त्यामुळे बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन नाराज झाले होते, आणि त्यांनी ट्विटर सोडण्याची धमकी दिली होती. स्कोर ट्रेंड्सच्या आकडेवारीनूसार, ही गोष्ट स्पष्ट झाली आहे, की अमिताभ बच्चन 100 अंकासह नंबर वन स्थानी आहेत. तर शाहरूख खान 68 अंकांसह दूस-या स्थानावर आहे. सुपरस्टार सलमान खान 95 स्कोरसह दूस-या स्थानी आहे. युवाईच्या गळ्यातला ताईत रणवीर सिंह 52 अंकांसह चौथ्या स्थानावर आणि सर्वाधिक बँकेबल एक्टर समजला जाणारा अक्षय कुमार 49 स्कोरसह पांचव्या स्थानी आहे.

स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात, “बिग बींच्या वाढत्या लोकप्रियतेनेच त्यांना फेसबुकवर मोस्ट एंगेजिंग भारतीय सेलिब्रिटी बनवले. बच्चनसरांच्या प्रत्येक पोस्टवर आणि ऑफिशिअल पेजवर 100 टक्के एंगेजमेंट दिसून आलीय.जी निश्चितच एक मोठी गोष्ट आहे. “

अमिताभ आणि ऋषी कपूर यांच्या जोडीचा ‘१०२ नॉट आउट’ काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आहे. चित्रपटाच्या कथेविषयी सांगायचे झाल्यास, बाप-मुलाचे नाते चित्रपटात अतिशय सुरेख पद्धतीने दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. वडिलांच्या भूमिकेत अमिताभ बच्चन असून, मुलाची भूमिका ऋषी कपूर यांनी साकारली आहे. एकीकडे वडील आपले अखेरचे दिवस अतिशय आनंदाने घालवू इच्छितात तर दुसरीकडे मुलगा प्रत्येक पाऊल अतिशय सावधपणे टाकणे पसंत करतो. या चित्रपटाच्या माध्यमातून अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर तब्बल २७ वर्षांनंतर एकत्र झळकले आहेत 
Web Title: Big B beat tweet!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.