Bhumi pednekar might be the reason of harleen and vicky kaushal split | कॅटरिना कैफमुळे नाही तर 'या' अभिनेत्रीमुळे झाले विकी कौशल आणि हरलीन सेठीचे ब्रेकअप
कॅटरिना कैफमुळे नाही तर 'या' अभिनेत्रीमुळे झाले विकी कौशल आणि हरलीन सेठीचे ब्रेकअप

ठळक मुद्देविकी कौशल हे नाव आता घराघरात पोहोचले आहेकाही दिवसांपूर्वी विकीची गर्लफ्रेंड हरलीन सेठीने त्याला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले

विकी कौशल सध्या त्याचा करिअरमध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहावे असा काळ अनुभवतोय. 'उरी'च्या यशानंतर विकी एका रात्रीत स्टार झाला आहे. विकी कौशल हे नाव आता घराघरात पोहोचले आहे. विकीची प्रोफेशनल लाईफ सुसाट चाललेली असतानाच पर्सनल लाईफमध्ये मात्र सगळं काही ठीक चालू नाहीय. 


काही दिवसांपूर्वी विकीची गर्लफ्रेंड हरलीन सेठीने त्याला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले. त्यानंतर दोघांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा बी-टाऊनमध्ये रंगली. आजतकच्या रिपोर्टनुसार विकी आणि भूमी पेडणेकरची वाढती जवळीक हरलीनला विकीपासून दूर घेऊन गेली. करण जोहरने 'तख्त'मध्ये विकी आणि भूमीला साईन केले आहे. याशिवाय दोघे आणखी एक हॉरर सिनेमात एकत्र दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी कॅटरिना कैफसोबत विकी कॉफी विद करणच्या सहाव्या सीजनमध्ये आला होता आणि त्यांने स्वत:ला कॅटचा मी मोठा फॅन असल्याचे सांगितले होते. त्यानंतर कॅटरिनामुळे विकी व हरलीनच्या आयुष्यात वादळ आल्याची चर्चा जोरात झाली होती. 

वर्क फ्रंटबाबत बोलायचे झाले तर विकी करण जोहरच्या मल्टीस्टारर सिनेमा 'तख्त'मध्ये दिसणार आहे. यात तो औरंगजेबच्या भूमिकेत दिसणार आहे. 'तख्त’ या पीरियड ड्रामात अर्थात ऐतिहासिक चित्रपटात मुघल शासनकाळातील एक कथा दाखवली जाईल. राजसिंहासनावरचे प्रेम आणि ते मिळवण्यासाठी वाट्टेल त्या स्तराला जाण्याचे मनसुबे असे याचे कथानक असेल. करण जोहर निर्मित या सिनेमात विकी आणि भूमीसह रणवीर सिंग, करीना कपूर, आलिया भट्ट, जान्हवी कपूर आणि अनिल कपूर असे तगडे कलाकार आपले अभिनय कौशल्य पणाला लावताना दिसतील. २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
 


Web Title: Bhumi pednekar might be the reason of harleen and vicky kaushal split
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.