Bhoomi Trailer Out: Sanjay Dutt's 'comeback' with tremendous action! | Bhoomi Trailer Out :​ जबरदस्त अ‍ॅक्शनसह संजय दत्तची ‘वापसी’!

संजय दत्तने पुन्हा एकदा दमदार वापसी केली आहे. होय, आम्ही हे बोलतोय, तेही अगदी दाव्यानिशी. ‘भूमी’ या संजयच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्हीही हेच म्हणाल. या मोस्ट अवेटेड चित्रपटाचा ट्रेलर आज रिलीज झाला. 
हा चित्रपट बाप-लेकीच्या कथेवर आधारित आहे. आपल्या मुलीच्या अब्रूसाठी हा पिता संपूर्ण जगाशी वैर घेतो, असे ट्रेलरमध्ये दिसते. संजयने यात पित्याची भूमिका साकारली आहे तर अदिती राव हैदरी हिने संजयच्या मुलीची भूमिका साकारली आहे.‘भूमी’चे ट्रेलर एक दु:खद कथा सांगते. संजय आपल्या मुलीवर जीवापाड प्रेम करत असतो. पण त्याची जीवापाड जपलेली मुलगी काही नराधमांच्या अत्याचाराला बळी पडते. आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी हा पिता संपूर्ण जगाशी लढायला निघतो आणि आपल्या मुलीवर झालेल्या अन्यायाचा सूड घेतो. संजयसोबत शेखर सुमन आणि शरद केळकर यांच्याही या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. त्यांची एक झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते. यातील काही दृश्ये पाहून तुमचे डोळे पाणावतात.
५८ वर्षांचा संजय या चित्रपटात पुन्हा एकदा अ‍ॅक्शन अवतारात दिसतो आहे. उमंग कुमार दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २२ सप्टेंबरला रिलीज होतो आहे. या चित्रपटाकडून संजयला बºयाच अपेक्षा आहेत. अलीकडे एका मुलाखतीत संजयने या अपेक्षा बोलून दाखवल्या होत्या. अनेक वर्षांनंतर ‘भूमी’च्या सेटवर पहिल्या दिवशी काम करण्याचा अनुभव शानदार होता. हा दिवस मी कधीही विसरू शकत नाही. मी पुन्हा माझ्या कामावर परतलो होतो. हा दिवस मला भावूक करणारा होता. मी या चित्रपटाच्या रिलीजची आतूरतेने प्रतीक्षा करतोय, असे तो म्हणाला होता.
Web Title: Bhoomi Trailer Out: Sanjay Dutt's 'comeback' with tremendous action!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.