Bhojpuri song 'Kahia Fit Hoi Taar' hits the tube, watch the video! | ‘कहिया फिट होइ टाका’ या भोजपुरी गाण्याने यू-ट्यूबवर केला हंगामा, पहा व्हिडीओ!

भोजपुरी चित्रपटांची वैशिष्ट्ये म्हणजे त्यातील रंगीबेरंगी अंदाज होय. हा अंदाज भोजपुरी चित्रपटांबरोबरच प्रत्येक ठिकाणी बघावयास मिळतो. त्याची झलक अभिनेता राहुल सिंग याच्या ‘लाली लगावेलू’ या अल्बममध्येही बघावयास मिळत असून, त्यातील ‘कहिया फिट होइ टाका’ या गाण्याने प्रेक्षकांना अक्षरश: मोहिनी घातली आहे. सध्या हे गाणे प्रचंड व्हायरल होत असून, प्रेक्षकांकडून त्यास तुफान प्रसिद्धी मिळत आहे. दरम्यान, वेव म्युझिककडून हे गाणे कालच यू-ट्यूबवर रिलीज करण्यात आले. ज्याला केवळ २४ तासांत एक लाखापेक्षा अधिक वेळा बघण्यात आले आहे. या गाण्यात निशा दुबेचे ठुमके चांगलेच बघावयास मिळत आहेत. तिच्यासोबत राहुल सिंगनेही चांगलीच धमाल केल्याचे दिसून येते. 

‘कहिया फिट होइ टाका’च्या रिलीजवर निशाने सांगितले की, ‘मला अपेक्षा होती की हा अल्बम प्रचंड पसंत केला जाईल. यातील सर्वच गाणे एंटरटेनिंग आहेत. त्यातील ‘कहिया फिट होइ टाका’ हा गाणे आणखीनच स्पेशल आहे. हा अल्बम नव्या कॉन्सेप्ट आणि प्रेक्षकांच्या आवडी लक्षात घेऊन बनविण्यात आला आहे.’ दरम्यान, प्रेक्षकांकडून अल्बमला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे आनंदी असल्याचे निशाने सांगितले. दरम्यान, ‘लाली लगावेलू’ या अल्बमचे गायक बबलू भैया आहे. तर म्युझिक आणि लिरिक्स मुन्ना दुबे याने दिले आहे. अल्बमला अनिल चौरसिया यांनी दिग्दर्शित केले असून, ब्रजेश पांडेने त्याची निर्मिती केली आहे. या संपूर्ण अल्बमची शूटिंग मुंंबईतील मडआयलॅण्ड आणि अमंडी येथे करण्यात आली आहे. अल्बमला संजय कुंचकोर्वे याने कोरिओग्राफ केले आहे. 
Web Title: Bhojpuri song 'Kahia Fit Hoi Taar' hits the tube, watch the video!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.