अली अब्बास जाफर सांगतो, मला सलमानची ही गोष्ट आवडत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 06:30 AM2019-05-08T06:30:00+5:302019-05-08T06:30:02+5:30

सलमान आणि कतरिनाचे अली अब्बास सोबत नाते खूपच चांगले आहे. ते तिघेही एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत.

Bharat director Ali Abbas Zafar reveals one bad thing about working with Salman Khan | अली अब्बास जाफर सांगतो, मला सलमानची ही गोष्ट आवडत नाही

अली अब्बास जाफर सांगतो, मला सलमानची ही गोष्ट आवडत नाही

googlenewsNext
ठळक मुद्देसलमान कधीच वेळेवर येत नसल्याने त्याच्यासाठी नेहमीच वाट पाहावी लागते. आमच्यामध्ये कधी चीक चीक झाली असेल तर केवळ ती त्याचमुळे होत असे.

अली अब्बास जाफर आणि सलमान खान यांनी अनेक चित्रपटांसाठी एकत्र काम केले आहे. त्या दोघांच्या जोडीने टायगर जिंदा है, सुलतान यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्या दोघांच्या जोडीचा आता भारत हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. भारत या चित्रपटात सलमानचे वेगवेगळे सहा लूक असल्याने या चित्रपटाबाबत प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता आहे. या चित्रपटात कतरिना कैफ आणि सलमान खान यांची सुपरहिट जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सलमान खान आणि कतरिना कैफसोबत जॅकी श्रॉफ, नोरा फतेही, सुनील ग्रोव्हर, तब्बू, दिशा पाटनी असे अनेक कलाकार आहेत.

सलमान आणि कतरिनाचे अली अब्बास सोबत नाते खूपच चांगले आहे. ते तिघेही एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. सध्या भारत या चित्रपटाचे अली जोरदार प्रमोशन करत असून सलमान खानसोबत काम करण्याचा अनुभव खूपच चांगला असतो असे अलीने एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितले आहे. पण त्याचसोबत अलीला सलमानची एक गोष्ट आवडत नसल्याचे त्याने कबूल केले आहे. अली अब्बास जाफरने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, सलमानसोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान असतो. एखादे दृश्य तुम्हाला कशाप्रकारे चित्रीत करायचे हे तुमच्या डोक्यात असते. पण सलमान तो सीन त्यापेक्षाही चांगल्या प्रकारे करतो. सलमान आणि त्याच्या फॅन्समध्ये एक वेगळेच नाते आहे. तो कोणत्याही व्यक्तिरेखेला खूपच चांगल्याप्रकारे उभा करतो. त्यामुळे त्याला काय म्हणायचे आहे हे त्याच्या फॅन्सना लगेचच कळते. 

सलमानची अलीने स्तुती केली असली तरी सलमानची एक गोष्ट त्याला आवडत नसल्याची त्याने कबुली दिली आहे. अली सांगतो, सलमान कधीच वेळेवर येत नसल्याने त्याच्यासाठी नेहमीच वाट पाहावी लागते. आमच्यामध्ये कधी चीक चीक झाली असेल तर केवळ ती त्याचमुळे होत असे. मी चित्रीकरणादरम्यान रोज संध्याकाळी त्याला भेटून वेळेवर येण्याविषयी सांगत असे. त्यावर मी तुझ्या आधीच सेटवर पोहोचलेला असेन असेच त्याचे उत्तर असायचे.  

Web Title: Bharat director Ali Abbas Zafar reveals one bad thing about working with Salman Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.