कॅटरिना कैफच्या ‘या’ लाडक्या दिग्दर्शकाने कंगना राणौतसोबत काम करण्यास दिला नकार!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 01:04 PM2019-02-21T13:04:08+5:302019-02-21T13:05:03+5:30

कंगनाची बेधडक वृत्ती आणि  ती ओढवून घेत असलेले वाद यामुळेच अनेक बडे निर्माता-दिग्दर्शक तिच्यासोबत काम करण्यास कचरतात.

bharat director ali abbas zafar doesnt want to work with kangana ranaut | कॅटरिना कैफच्या ‘या’ लाडक्या दिग्दर्शकाने कंगना राणौतसोबत काम करण्यास दिला नकार!

कॅटरिना कैफच्या ‘या’ लाडक्या दिग्दर्शकाने कंगना राणौतसोबत काम करण्यास दिला नकार!

googlenewsNext
ठळक मुद्देलवकरच कंगना राजकुमार रावसोबत ‘मेंटल है क्या’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय अश्विनी अय्यरच्या ‘पंगा’ या चित्रपटातही ती दिसणार आहे.

कंगना राणौत रोज नवे वाद ओढवून घेते. कंगनाच्या अलीकडे रिलीज झालेल्या ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटानेही अनेक वाद ओढवून घेतले. चित्रपटाच्या कमाईवरही त्याचा परिणाम झाला. तीन आठवड्यानंतरही हा चित्रपट चित्रपटगृहांत टिकून आहे. पण कमाई थंड पडली आहे. कंगनाची बेधडक वृत्ती आणि  ती ओढवून घेत असलेले वाद यामुळेच अनेक बडे निर्माता-दिग्दर्शक तिच्यासोबत काम करण्यास कचरतात. असाच एक दिग्दर्शक म्हणजे, अली अब्बास जफर. होय, मी कधीच कंगनासोबत काम करणार नाही, अशी बेधडक कबुली जफरने नुकतीच दिली.


टायगर जिंदा है, गुंडे सारखे सुपरडुपर हिट चित्रपट देणाºया आणि सध्या सलमान खान-कॅटरिना कैफच्या ‘भारत’ चित्रपटात बिझी असलेल्या अली अब्बास जफरने एका चॅट शोमध्ये हा खुलासा केला. तुला कुठल्या अभिनेत्रीसोबत काम करणे आवडणार नाही, असा प्रश्न त्याला विचारला गेला. यावर क्षणाचाही विचार न करता त्याने कंगना राणौतचे नाव घेतले. त्याच्या या उत्तरानंतर शोच्या होस्टने यामागचे कारण विचारले. पण अली यावर उत्तर देणार त्याआधीच कॅटरिना कैफ मध्ये पडली. आता तू दुसरा प्रश्न विचार, असे म्हणून तिने या प्रश्नाला कलाटणी दिली आणि मग सगळेच हसू लागले.
एकंदर काय तर कंगनाने अनेकांशी ‘पंगा’ घेतलाय. याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम तिला भोगावे लागताहेत. लवकरच कंगना राजकुमार रावसोबत ‘मेंटल है क्या’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय अश्विनी अय्यरच्या ‘पंगा’ या चित्रपटातही ती दिसणार आहे.

Web Title: bharat director ali abbas zafar doesnt want to work with kangana ranaut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.