Bhairavi Goswami said, 'Some actors sleep with men, then I cry as I am exploited'! | भैरवी गोस्वामीने म्हटले, ‘काही अभिनेत्री पुरुषांबरोबर झोपतात, मग माझे शोषण झाले म्हणून रडतात’!

शोषणाच्या मुद्द्यावर नेहमीच फिल्मी कलाकार त्यांचे मत मांडत असतात. बºयाचशा कलाकारांनी जाहीरपणे मान्य केले आहे की, त्यांचे शोषण झाले आहे. तर काहींनी याबाबतची रीतसर तक्रारही दाखल केली आहे. आता पुन्हा एकदा एका बॉलिवूड अभिनेत्रीने याच मुद्द्यावर तिचे रोखठोक मत मांडले आहे. ‘हेट स्टोरी’मध्ये झळकलेली भैरवी गोस्वामी हिने ट्विटरच्या माध्यमातून शोषणाविषयी सांगणाºया कलाकारांवर विशेषत: अभिनेत्रींवर जोरदार हल्ला केला आहे. 

भैरवीने ट्विटमध्ये लिहिले की, ‘काम मिळविण्यासाठी अभिनेत्री अगोदर पुरुषांबरोबर झोपतात. (यास नाकारता येत नाही) त्यानंतर तब्बल दहा वर्षांनी म्हणतात की, माझे शोषण झाले आहे.’ भैरवीच्या या ट्विटनंतर एकच खळबळ उडाली असून, अनेकांनी त्यास प्रतिक्रिया दिल्या आहेत. नेटिझन्सनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘जर एखाद्या अभिनेत्रीचे शोषण होते तर त्या अभिनेत्रीकडून तेव्हाच याबाबत का सांगितले जात नाही?’ तर काहींनी अशाही प्रतिक्रिया दिल्या की, ‘केवळ अभिनेत्रीच नव्हे तर सर्वसामान्य महिलादेखील पैशांसाठी अशाप्रकारचे शोषणाचे आरोप लावतात. दरम्यान, भैरवी तिच्या या ट्विटमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. याअगोदरदेखील अभिनेत्री क्रिती सॅनन हिच्याबद्दल केलेल्या एका ट्विटमुळे भैरवी चर्चेत आली होती. क्रितीने अर्जुन कपूरच्या ‘मुबारकां’ या चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी ‘हवा हवा’ या गाण्यावर डान्स करतानाचा एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता. ज्यावर भैरवीने कॉमेण्ट करून क्रितीला डिवचले होते. त्यावेळी दोघींमधील वाद चांगलाच चव्हाट्यावर आला होता. शिवाय भैरवी यामुळे लाइमलाइटमध्ये आली होती. 
 }}}} ">It’s interesting 2note actresses sleep 2get wrk(let’s nt deny that), get famous then say they were molested 10yrs ago.

It’s interesting 2note actresses sleep 2get wrk(let’s nt deny that), get famous then say they were molested 10yrs ago.

— Bhairavi Goswami (@bhairavigoswami)
October 11, 2017}}}} ">— Bhairavi Goswami (@bhairavigoswami) October 11, 2017
भैरवीने म्हटले होते की, ‘क्रिती सॅनन खरोखरच एखाद्या विक्षिप्त महिलेप्रमाणे वागत आहे. ती अखेर अभिनेत्री कशी बनली हेच कळत नाही. कुठलाही हेडलाइट नाही का बम्पर नाही. हिच्यापेक्षा तर कॉलेज स्टुडंट चांगल्या दिसतात.’ असो, भैरवीने ‘हेट स्टोरी’ व्यतिरिक्त ‘भेजा फ्राय, माय फ्रेंड गणेशा-२, मिस्टर भट्टी की चुट्टी’ आदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. 
Web Title: Bhairavi Goswami said, 'Some actors sleep with men, then I cry as I am exploited'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.