पाऊस पडायला लागला की, बॉलिवूडची काही गाणी हमखास ओठांवर येतात. ‘श्री420’मधील ‘प्यार हुआ इकरार हुआ’ पासून तर ‘थ्री इडियट्स’मधल्या ‘झुबी डुबी झुबी डुबी’पर्यंतची अनेक पाऊस गाणी आपल्याला आठवतात. अशीच काही टॉपची पाऊस गाणी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

प्यार हुवा इकरार हुवा है प्यारसे फिर क्यूं डरता है दिलराज कपूर आणि नर्गिस या दोघांचे ‘श्री ४२० ’ मधलं ‘प्यार हुवा इकरार हुवा है प्यारसे फिर क्यूं डरता है दिल’ हे अप्रतीम पाऊस गाण. सदाबहार असेच या गाण्याचे वर्णन करता येईल. एकच छत्री, एकाच वेळी दोघांना सारखाच भिजवणारा पाऊस, इतकं जवळ असूनही कुठेही अघाशी प्रेमाचा मागमूसही नाही, हे गाणं तुम्ही ऐकायलाच हवे.

किसी के हाथ ना आयेगी ये लडकी‘चालबाज’ मधल्या श्रीदेवीच्या ‘किसी के हाथ ना आयेगी ये लडकी’ने या गाण्यानेही रसिक श्रोत्यांना वेड लावले.  श्रीदेवीच्या खट्याळ अदांनी सजलेलं गाण एक बेस्ट रेनी साँग आहे.
 
लगी आज सावन की फिर वो झडी है‘चांदनी’मधील ‘लगी आज सावन की फिर वो झडी है’मधील हॉट अ‍ॅण्ड सेक्सी श्रीदेवी आणि या गाण्याचे वेड लावणारे स्वर सगळेच अ़प्रतिम म्हणायला हवे.

आज रपट जाये तोस्मिता पाटील आणि अमिताभ बच्चन यांच्या हॉट केमिस्ट्रीने सजलेले हे गाणे तुम्ही ऐकायलाच हवे.

बरसो रे मेघा मेघा‘बरसो रे मेघा मेघा’ हे गाणे पावसाळी दिवसांत प्रत्येकाच्याच ओळांवर असते. ‘गुरू’ चित्रपटातील या गाण्यात ऐश्वर्यावर सगळ्यांच्याच नजरा का खिळून राहतात, हे तुम्हीच बघा.

 टीप टीप बरसा पानीअक्षय कुमार आणि रवीना टंडन यांच्यावर चित्रीत या गाण्याशिवाय पावसाची मज्जाच येणार नाही.

कोई लडकी है‘दिल तो पागल है’ या चित्रपटातील ‘कोई लडकी है’ हे गाणे म्हणजे, पावसाच्या दिवसात एक रोमॅन्टिक ट्रिट.
Web Title: Best Rain Songs: Rainy seasoning Bollywood Songs !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.