पडद्यावरही गाजला राजकारणाचा आखाडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 01:20 PM2019-04-11T13:20:55+5:302019-04-11T16:22:29+5:30

सध्या सर्वत्र लोकसभेच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. यंदाच्या निवडणूकीत कोण जिंकेल, कोण हारेल यावरुन ठिकठिकाणी राजकारण्यांमध्ये वादविवाद प्रसंगी हाणामारीदेखील घडत आहे. विशेष म्हणजे प्रत्यक्ष राजकारणाशी प्रेरित होऊन चित्रपट निर्मात्यांनी अशाच पद्धतीचे राजकारण पडद्यावर दाखविले आहे. हे चित्रपट प्रेक्षकांना तर आवडलीच शिवाय बॉक्स आॅफिसवरही त्यांनी बक्कळ कमाई केली. जाणून घेऊया त्या चित्रपटांबाबत...

Best Political Movies In Bollywood | पडद्यावरही गाजला राजकारणाचा आखाडा!

पडद्यावरही गाजला राजकारणाचा आखाडा!

googlenewsNext

-रवींद्र मोरे
सध्या सर्वत्र लोकसभेच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरु आहे. यंदाच्या निवडणूकीत कोण जिंकेल, कोण हारेल यावरुन ठिकठिकाणी राजकारण्यांमध्ये वादविवाद प्रसंगी हाणामारीदेखील घडत आहे. विशेष म्हणजे प्रत्यक्ष राजकारणाशी प्रेरित होऊन चित्रपट निर्मात्यांनी अशाच पद्धतीचे राजकारण पडद्यावर दाखविले आहे. हे चित्रपट प्रेक्षकांना तर आवडलीच शिवाय बॉक्स आॅफिसवरही त्यांनी बक्कळ कमाई केली. जाणून घेऊया त्या चित्रपटांबाबत...

* नायक
२००१ मध्ये बनलेला हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडला होता. अनिल कपूरच्या आतापर्यंतच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक ‘नायक’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटात अनिल कपूरला रिपोर्टर ते एक राजकारणी होताना दाखविले आहे. राजकारणी झाल्यानंतर अमरिश पुरीसोबतची त्याची राजकीय जुगलबंदी जबरदस्त दाखविण्यात आली आहे. चित्रपटात अनिल कपूरच्या अपोजिट राणी मुखर्जीला दाखविण्यात आले आहे आणि यात परेश रावलचीही मुख्य भूमिका आहे.

* राजनीति
प्रकाश झा दिग्दर्शित हा एक राजनितिक फॅमिली ड्रामावर आधारित चित्रपट आहे. यात कॅटरिना कैफ, रणबीर कपूर, अर्जुन रामपाल, मनोज वाजपेयी आणि नाना पाटेकर सारखे अ‍ॅक्टर्स मुख्य भूमिकेत होते. चित्रपटातील रणबीर कपूरच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी खूपच कौतुक केले होते. यात जबरदस्त राजकीय डावपेच दाखविण्यात आले असून २०१० मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट ठरला होता.

* सत्याग्रह
आमिताभ बच्चन आणि अजय देवगन स्टारर चित्रपट ‘सत्याग्रह’ हा २०१३ मध्ये रिलीज झाला होता. मुलाच्या अपघातानंतर एक वडिल संपूर्ण सिस्टमशी कसा लढतो, हे या चित्रपटात दाखविण्यात आले आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, अजय देवगन शिवाय करिना कपूर, अमृता राव आणि अर्जुन रामपाल मुख्य भूमिकेत होते.

* यंगिस्तान
२०१४ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात जॅकी भगनानी आणि नेहा शर्मा मुख्य भूमिकेत दिसले होते. यात भारतीय राजकारणाचे बदलते पैलू दाखविण्यात आले होते. या चित्रपटात मॉर्डन इंडियाला दाखविण्यात आले असून ज्यात एक २८ वर्षीय मुलगादेखील पंतप्रधान बनू शकतो हे दर्शविण्यात आले आहे. यात नेहा शर्मा प्रेमिकेच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन सैय्यद अहमद अफजलने डायरेक्ट केले होते.

* गुलाल
२००९ मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट विद्यार्थी राजकारणावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग कश्यपने केले होते. यात दीपक डोबरियाल, केके मेनन आणि राज सिंह चौधरी मुख्य भूमिकेत होते. बाहेरच्या राजकारणात जशी रणधुमाळी चालते तशी कॉलेजीयन विद्यार्थ्यांमध्येही राजकारण कसे गाजते हे या चित्रपटात दाखविले आहे.

Web Title: Best Political Movies In Bollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.