The Best Part About Diwali Is Gambling said Aamir Khan | आमिर खानला या कारणामुळे आवडते दिवाळी
आमिर खानला या कारणामुळे आवडते दिवाळी

आमिर खानसाठी ही दिवाळी खूपच खास आहे. कारण त्याचा ठग्स ऑफ हिंदुस्तान हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच आपल्याला आमिर खान आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना एकत्र पाहायला मिळत आहे. यासोबतच या चित्रपटात कॅटरिना कैफ आणि फतिमा सना शेख यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे प्रदर्शनासोबतच आमिरसाठी यंदाची दिवाळी आणखी एका कारणासाठी खास आहे. कारण नुकताच म्हणजेच ७ नोव्हेंबरला आमिरची पत्नी किरण रावचा वाढदिवस झाला. दिवाळीत किरणचा वाढदिवस आल्याने त्याच्यासाठी ही दिवाळी खूपच स्पेशल असल्याचे त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले.

ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी नुकत्याच आमिरने त्याच्या दिवाळीच्या आठवणी सांगितल्या. दिवाळी हा सण त्याला खूपच आवडतो आणि हा सण आवडण्यामागे एक खास कारण असल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्याने डिएनए वर्तमानपत्राशी गप्पा मारताना सांगितले की, दिवाळी या सणाच्या निमित्ताने तुम्हाला तुमच्या कुटुंबियांसोबत सगळ्यात जास्त वेळ घालवायला मिळतो ही गोष्ट मला सगळ्यात जास्त आवडते. यावर्षी दिवाळीतच माझी पत्नी किरणचा वाढदिवस आला असल्याने यंदाची दिवाळी तर माझ्यासाठी खूप खास आहे. ही दिवाळी माझ्याप्रमाणे सगळ्यांसाठी खास असावी, प्रत्येकाने दिवाळी आनंदात साजरी करावी अशी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. तसेच दिवाळी हा सण सुरक्षितपणे साजरा करावा असे मी माझ्या फॅन्सना आवर्जून सांगेन. या सणाच्या निमित्ताने पत्ते खेळायला मिळतात ही गोष्ट तर मला खूप आवडते. मी पत्ते खेळायला लागलो की, जुगारीच बनतो असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. वर्षांतून एकदा सगळ्यांसोबत पत्ते खेळायला खूपच मजा येते. मी यंदाच्या दिवाळीत देखील आवर्जून पत्ते खेळणार आहे. 

ठग्स आॅफ हिंदोस्तान या चित्रपटाचे दिग्दर्शक विजय कृष्ण आचार्य यांनी केले असून या चित्रपटाची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 


Web Title: The Best Part About Diwali Is Gambling said Aamir Khan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.