बॉलिवूडमध्ये दोन अशा मैत्रिणी आहेत, ज्यांच्या मैत्रीची मिसाल दिली जाते. होय, या दोन मैत्रिणी म्हणजे अभिनेत्री करिना कपूर-खान आणि मलाइका अरोरा होत. मात्र नुकत्याच एका मुलाखतीत मलाइका अरोराने करिनाविषयी असे काही वक्तव्य केले, जे ऐकून यांच्या मैत्रीत दरार तर निर्माण झाली नाही ना, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. मलाइका काही दिवसांपूर्वीच बहीण अमृतासोबत नेहा धूपियाच्या चॅट शोमध्ये सहभागी झाली होती. नेहाने मलाइकाला करिनाविषयी एक प्रश्न विचारला ज्याचे उत्तर ऐकून नेहालाही धक्का बसला. त्याचे झाले असे की, नेहा धूपियाने चॅट शोदरम्यान मलाइकाला करिनाशी संबंधित एक प्रश्न विचारला. नेहाने विचारले की, करिनाला काय करणे सोडून द्यायला हवे? या प्रश्नाचे मलाइकाने क्षणातच उत्तर देताना म्हटले की, करिनाने अफवा पसरविणे सोडून द्यायला हवे. मलाइकाचे उत्तर ऐकून नेहाला तर धक्काच बसला. शिवाय या दोघींच्या मैत्रीत दरार तर निर्माण झाली नाही ना, अशीही चर्चा यानिमित्ताना रंगली. कारण या दोघी खूप चांगल्या मैत्रिणी असून, त्यांच्या मैत्रीची सध्याच्या पिढीला मिसाल दिली जाते. शिवाय बॉलिवूडमध्येही या दोघींची मैत्री नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. दरम्यान, करिनाबद्दल असे विधान मलाइकानेच केले असे नाही तर याअगोदरदेखील करण जोहरच्या चॅट शोमध्ये करिनाला गॉसिप क्वीन असे म्हटले होते. करणने स्वत:च म्हटले होते की, इंडस्ट्रीविषयी मला कुठलीही माहिती हवी असली की, मी त्वरित करिनाला फोन करीत असतो. कारण तिच्याकडे प्रत्येक गोष्टींच्या अपडेट असतात.
Web Title: Best friend Malaika Arora, directed by Kareena Kapoor, read detailed!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.