Best Actor in Manoj | मनोज ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता

कॅरक्टर अ‍ॅक्टर मनोज वाजपेयी सध्य जाम खूश आहे. त्याचा ‘ट्रॅफिक’ सिनेमा प्रदर्शनाच्या मार्गावर आहे आणि त्यातच त्याला आणखी एक खूश खबर मिळाली आहे.

हंसल मेहता दिग्दर्शित ‘अलिगड’ चित्रपटतील भूमिकेसाठी मनोजला ‘दादासाहेब फाळके अवॉर्ड’मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (क्रिटिक्स चॉईस) पुरस्कार जाहीर झाला आहे.

याची माहिती खुद्द मेहता यांनी ट्विटरवरून दिली. त्यांनी ट्विट केले की, प्राध्यापक रामचंद्र सिरस यांची भूमिका उत्तमपणे वठविण्याबद्दल मनोजची ‘दादासाहेब फाळके अवॉर्ड’च्या ‘बेस्ट अ‍ॅक्टर’ (क्रिटिक्स चॉईस) पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
{{{{twitter_post_id####}}}}

मनोजनेदेखील ट्विट करून त्याचा आनंद व्यक्त केला. तो लिहितो, माझ्या कामाचे कौतुक केल्याबद्दल धन्यवाद. या क्षणाला मी स्वत:ला अतिशय सन्मानित वाटत आहे. चाहते आणि परीक्षकांचे खूप खूप आभार.
{{{{twitter_post_id####}}}}

रविवारी एका सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. वेल डन मनोज!!
Web Title: Best Actor in Manoj
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.