‘दम लगा के हईशा’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणारी अभिनेत्री भूमी पेडणेकर अतिशय स्टाईलिश आहे. तिचा ड्रेसिंग सेन्सही जबरदस्त आहे. सध्या भूमी पेडणेकर तिच्या चित्रपटामुळे वा तिच्या स्टाईलमुळे नाही तर तिच्या जुळ्या बहिणीमुळे चर्चेत आहे. होय, भूमीला एक जुळी बहीण आहे. तिचे नाव समीक्षा पेडणेकर. तुम्ही भूमी व समीक्षा या दोघींनाही एकत्र बघाल तर त्यांना ओळखणे कठीण आहे. याचे कारण म्हणजे, समीक्षाही अगदी भूमीसारखी आहे.भूमीप्रमाणेच समीक्षा केवळ सुुंदरचं नाही तर ती कमालीची हॉट आणि सेक्सी आहे. समीक्षाचे फोटो बघितल्यावर तुम्हाला याचा अंदाज येईल. स्वत:ला मेंटेन ठेवण्यासाठी समीक्षा काय काय करत असावी, याचा अंदाजही तुम्हाला येईल.बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींच्या बहीणी बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेण्यास उत्सूक आहेत. कॅटरिना कैफची बहीण इसाबेल कैफ, क्रिती सॅननची बहीण नुपूर सॅनन अशी काही नावे या यादीत घेता येतील. पण भूमी इतकीच सुंदर असूनही समीक्षाचा मात्र बॉलिवूडमध्ये येण्याचा कुठलाही इरादा नाही.तूर्तास ती वकिलीचे शिक्षण घेतेय आणि याच क्षेत्रात तिला आपले करिअर करायचे आहे. 
समीक्षा फारशी बॉलिवूडच्या इव्हेंटला दिसत नाही़ अनुष्का शर्मा व विराट कोहलीच्या लग्नात ती पहिल्यांदा भूमीसोबत दिसली होती. तो समीक्षाचा पहिला बॉलिवूड इव्हेंट होता.ALSO READ : टीव्ही शोमध्ये आयुष्यमान खुराणाने जाहीरपणे भूमी पेडणेकरच्या प्रायव्हेट लाइफबद्दल केला खुलासा!

या इव्हेंटमध्ये भूमी व समीक्षा दोघीही पारंपरिक लूकमध्ये दिसल्या होत्या. तूर्तास आपण समीक्षाचे काही फोटो पाहूयात. तिचे फोटो पाहून तुमच्या मनात काही प्रतिक्रिया आल्याच तर त्या तुम्ही खालील कमेंटबॉक्समध्ये लिहू शकता.
भूमीने तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात २०१५ मध्ये आयुष्यमान खुराना याच्यासोबत ‘दम लगाके हईशा’ या चित्रपटातून केली. गेल्या वर्षीच दोघांचा ‘शुभमंगल सावधान’ हा दुसरा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यास प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. 
Web Title: As beautiful as a sister, sister is stylish! See, pictures of beautiful woman from the land!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.