दाक्षिणात्य चित्रपटातील सुंदर चेह-यांचे बॉलिवूडला कायम आकर्षण राहिले आहे़ एका अशाच सुंदर चेह-याने बॉलिवूडला भूलवले आहे. हा चेहरा आहे वेधिका कुमार हिचा. होय, बॉलिवूडमध्ये साऊथच्या अनेक नट्या आल्यात़ काही हिट झाल्यात तर काही आल्या तशाच गेल्यात़ या यादीत आता वेधिकाचे नावही सामील झाले आहे. आपल्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटात वेधिका इमरान हाश्मीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.
काही दिवसांपूर्वी सुनील क्षेत्रपाल यांनी या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाद्वारे दाक्षिणात्य दिग्दर्शक जीतू जोसेफ बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेत आहेत. याच चित्रपटात वेधिकाची वर्णी लागली आहे. २०१२ मध्ये आलेल्या क्राईम थ्रीलर ‘द बॉडी’चा हिंदी रिमेक आले. हा मुळात एक स्पॅनिश चित्रपट आहे. इंग्रजीत ‘द बॉडी’ या नावाने तो रिलीज झाला होता. याच्या हिंदी रिमेकलाही तूर्तास ‘द बॉडी’ हेच नाव देण्यात आले आहे.या चित्रपटासाठी शोभिता धूलिपाला हिची निवड आधीच झाली आहे. वेधिका या चित्रपटाची दुसरी नायिका आहे. या चित्रपटात ऋषी कपूर एका महत्त्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.वेधिकाबद्दल सांगायचे तर ती मुंबईच्या किशोर नामित कपूर अ‍ॅक्टिंग इन्स्टिट्यूटची स्टुडंट राहिलेली आहे. २०१३ मध्ये आलेल्या ‘परदेसी’ या तेलगू चित्रपटात तिने साकारलेली अन्गाम्माची भूमिका प्रचंड गाजली होती, यानंतर याचवर्षी आलेल्या ‘श्रृंगारवेलन’ हा तिचा चित्रपटही सुपरहिट झाला होता.ALSO READ :​इमरान हाश्मीचा हुबेहुब कार्बन कॉपी! विश्वास बसत नसेल तर तुम्हीही पाहा!!

२००६ मध्ये आपल्या करिअरची सुरूवात करणा-या वेधिकाने आत्तापर्यंत २० वर तेलगू चित्रपटांत काम केले आहे.
‘द बॉडी’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्यानंतर वेधिका सध्या जाम खूश आहे. बॉलिवूडमध्ये मला अशाच चित्रपटाची प्रतीक्षा होती. इमरान हाश्मी एक उत्तम अभिनेता आहे. त्याच्यासोबत काम करण्यास मी प्रचंड उत्सूक आहे, असे तिने म्हटलेय.
आता वेधिकाचा सुंदर चेहरा बॉलिवूडच्या पे्रक्षकांना किती पसंत पडतो आणि हा चित्रपट वेदिकाला किती यश मिळवून देतो ते बघूच. तोपर्यंत वेधिकाचे काही सुंदर व ग्लॅमरस फोटो आपण पाहू यात.
Web Title: A beautiful face of South will appear with 'Siri Kisar' Imran Hashmi; Know who?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.