'Bahubali' will surprise the fans of Prabhas; Birth Announce a special annunciation! | ‘बाहुबली’ प्रभास चाहत्यांना देणार सरप्राइज; बर्थ डेला करणार एक स्पेशल अनाउंसमेंट!

हे वर्ष बाहुबली प्रभासकरिता खूपच चांगले गेले आहे. एकीकडे प्रभासच्या ‘बाहुबली-२’ने बॉक्स आॅफिसवर एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमविला असून, दुसरीकडे तो आता त्याच्या अ‍ॅक्शनपट ‘साहो’वरही काम करीत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर रोमान्स करताना बघावयास मिळणार आहे. असो, आज आम्ही प्रभासच्या बर्थ डेविषयी तुम्हाला सांगणार आहोत. वास्तविक प्रभास नेहमीच त्याच्या चाहत्यांची काळजी घेत असतो. यावेळेसदेखील तो त्याच्या चाहत्यांना अशीच काहीशी सरप्राइज देण्याच्या विचारात आहे. त्यासाठी तो खास प्लॅन करीत असल्याचेही समजते. होय, यावर्षी प्रभास त्याच्या बर्थ डेच्या दिवशी एक स्पेशल अनाउंसमेंट करणार आहे. त्यामुळे ही अनाउंसमेंट त्याच्या चाहत्यांसाठी सरप्राइज ठरणार आहे. 

इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, ‘बाहुबली’ प्रभास त्याच्या बर्थ डेच्या दिवशी त्याच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करणार असल्याची शक्यता आहे. प्रभासच्या या चित्रपटाचे बजेट १५० कोटी रुपये आहे. सध्या या चित्रपटाची शूटिंग सुरू असून, प्रभास त्यामध्ये व्यस्त आहे. प्रभासच्या ‘बाहुबली-२’च्या रिलीजबरोबरच ‘साहो’चा टीजर रिलीज करण्यात आला होता. तेव्हा या टीजरला चाहत्यांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. शिवाय या चित्रपटाची त्यांना सातत्याने आतुरताही लागली आहे. 

असो, प्रभासच्या बर्थ डेविषयी सांगायचे झाल्यास, त्याचा बर्थ डे २३ आॅक्टोबर रोजी असून, तो यादिवशी वयाचे ३८ वर्ष पूर्ण करणार आहे. असे म्हटले जात आहे की, प्रभास त्याच्या बर्थ डेनिमित्त ‘साहो’चे पोस्टर रिलीज करणार आहे. वास्तविक निर्मात्यांनी याविषयी अद्यापपर्यंत काहीही सांगितले नाही. त्यामुळे असे जर झाले तर त्याच्या चाहत्यांसाठी ही सरप्राइज असेल यात शंका नाही. त्याचबरोबर असेदेखील म्हटले जात आहे की, प्रभास या शुभदिनी त्याची मैत्रीण अनुष्का शेट्टी हिच्यासोबत लग्नाची अनाउंसमेंट करण्याची शक्यता आहे. असे म्हटले जात आहे की, प्रभास अनुष्कासोबत येत्या डिसेंबर महिन्याच्या दुसºया आठवड्यात साखरपुडा करणार आहे. 
Web Title: 'Bahubali' will surprise the fans of Prabhas; Birth Announce a special annunciation!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.