'Bahubali' Prabhasane 'DevSena' Anushka Shetty's birthday gift for birthday! What they read! | ​ ‘बाहुबली’ प्रभासने ‘देवसेना’ अनुष्का शेट्टी दिली वाढदिवसाची अलिशान भेट! काय, ते वाचाच!!

गत २३ आॅक्टोबरला ‘बाहुबली’ प्रभासचा वाढदिवस साजरा झाला होता. प्रभासच्या वाढदिवसाला ‘देवसेना’ अनुष्का शेट्टीने काय भेट दिली होती, हे तुम्हाला ठाऊक आहेच. आम्ही याबद्दलची बातमीही दिली होती. होय, अनुष्काने प्रभासला वाढदिवसाची भेट म्हणून एक महागडे मनगटी घड्याळ दिले होते. कारण प्रभासला घड्याळांची प्रचंड आवड आहे. याबाबत तो अगदी क्रेझी आहे. यानंतर वाढदिवसाची भेट देण्याची पाळी प्रभासची होती. होय, कारण गत ९ नोव्हेंबरला अनुष्काचा वाढदिवस होता. प्रभासनेही अनुष्काला वाढदिवसाचे गिफ्ट दिले असणार, यात शंका नाही. पण काय? चर्चा खरी मानाल तर प्रभासने अनुष्काला एक अलिशान बीएमडब्ल्यू कार भेट दिल्याची चर्चा आहे. अर्थात  या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. पण सध्या तामिळ सिनेसृष्टीत या बीएमडब्ल्यू कारचीच चर्चा रंगली आहे आणि ही चर्चा खरी असेल तर प्रभासने अनुष्काला अगदीच ‘परफेक्ट’ भेट दिली आहे.

ALSO READ: ​अनुष्का शेट्टीने नाकारली करण जोहरची ‘आॅफर’! वाचा काय आहे कारण!!

‘बाहुबली2’मध्ये प्रभास व अनुष्काची जोडी प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. याचबरोबर या जोडीच्या लिंकअपच्या बातम्याही येऊ लागल्या होत्या. मध्यंतरी येत्या डिसेंबरमध्ये अनुष्का व प्रभास साखरपुडा करणार, अशीही बातमी होती. या  चर्चा ऐकून ऐकून खुद्द प्रभासही गोंधळला आहे. त्याच्यात अन् अनुष्कातखरोखरचं काहीतरी आहे, असे त्याला वाटू लागलेय.  अलीकडे एका ताज्या मुलाखतीत खुद्द प्रभास हे बोलून गेला होता. या मुलाखतीत  अनुष्कासोबतच्या लिंकअपबाबत त्याला प्रश्न विचारला गेला होता. हा प्रश्न ऐकून प्रभास गालातल्या गालात हसला होता. ‘मी व अनुष्का गेल्या ९ वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. आम्ही खूप चांगले मित्र आहोत. आपल्या लिंकअपच्या बातम्या होऊ द्यायच्या नाहीत, हे आम्ही फार पूर्वीच ठरवले होते. पण या बातम्या येत राहिल्या आणि आता...? आता तर आमच्यात काही तरी आहे, असे मलाही वाटू लागले आहे,’ असे प्रभास यावर म्हणाला होता. 
 
Web Title: 'Bahubali' Prabhasane 'DevSena' Anushka Shetty's birthday gift for birthday! What they read!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.