Bahubali Fame Prabhas is not acting, but in the interest of this field | ​बाहुबली फेम प्रभासला अभिनय नव्हे तर या क्षेत्रात होत रस

आज प्रभास हा तरुणांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. तो केवळ दाक्षिणात्य इंडस्ट्रीत नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील तितकाच प्रसिद्ध आहे. तो २००२ पासून दाक्षिणात्य सिनेमात काम करत आहे. त्याचे अनेक दाक्षिणात्य सिनेमे हिट पण झाले आहेत. पण बॉलिवूड चित्रपट पाहाणाऱ्यांना प्रभास हे नाव तितकेसे माहीत नव्हते. त्याने अॅक्शन जॅक्सन या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. पण त्याला तेव्हा आज इतके फॅन फॉलॉव्हिंग नव्हते. पण आज तो केवळ साऊथ इंडस्ट्रीचाच नव्हे तर बॉलिवूडचा देखील सुपरस्टार बनला आहे.
प्रभासच्या बाहुबली द बिगिनिंग आणि बाहुबली २ द कन्क्ल्यूजन या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसचे आजवरचे सगळे रेकॉर्ड तोडले आहेत. या चित्रपटातील प्रभासच्या अभिनयाचे तर प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केले. या चित्रपटात अमरेंद्र आणि महेंदर बाहुबली या दोन्ही भूमिका त्याने तितक्याच ताकदीने साकारल्या आहेत. प्रभास एक खूप चांगला अभिनेता असल्याचे त्याने बाहुबली या चित्रपटाद्वारे सिद्ध केले आहे. प्रभास आता पुढच्या चित्रपटात कधी झळकणार याची आतुरतेने लोक वाट पाहात आहेत. तो सध्या साहो या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर प्रभाससोबत झळकणार आहे. 
तुम्हाला माहीत आहे क प्रभास हा आज आघाडीचा अभिनेता असला तरी त्याला कधीच अभिनयक्षेत्रात यायचे नव्हते. अभिनय क्षेत्रात करियर करण्याचा त्याने कधी विचार देखील केला नव्हता. त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, त्याला हॉटेल इंडस्ट्रीमध्ये करियर करायचे होते. त्याच्या घरातल्यांना सगळ्यांना हैद्राबादी जेवण प्रचंड आवडते आणि त्यामुळे हॉटेलच्या क्षेत्रातच करियर करायचे असे त्याने ठरवले होते. पण प्रभासच्या नशीबात काही वेगळेच लिहिले होते. 
प्रभास एक दिवस चाचा जी नावाचा चित्रपट पाहात होता. हा चित्रपट पाहाताना आपण या चित्रपटाचा नायक चाचा जी सारखा का होऊ शकत नाही? असा त्याला प्रश्न पडला आणि त्यानंतर त्याने अभिनयक्षेत्रात करियर करायचा निर्णय घेतला. 

Also Read : बाहुबली प्रभास अन् देवसेना अनुष्का शेट्टीचा ‘या’ दिवशी होणार साखरपुडा !
Web Title: Bahubali Fame Prabhas is not acting, but in the interest of this field
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.