'Bahubali' actress used to indulge in foreign indigenous tomatoes, and fans became wounded! | ‘बाहुबली’च्या या अभिनेत्रीने विदेशी तालावर देशी अंदाजात लावले ठुमके, चाहते झाले घायाळ!

‘बाहुबली’ या ब्लॉकबस्टर सिरीजमध्ये ‘अवंतिका’ हे पात्र साकारणारी अभिनेत्री तमन्ना भाटियाचा एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तमन्नाने या व्हिडीओमध्ये आपले डान्स स्किल्स दाखविले आहेत. तमन्ना विदेशी संगीतावर देसी अंदाजात थिरकताना दिसत आहे. तमन्नाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. यामध्ये ती डीजे स्नेकचे ‘मजेंटा रिदिम’ या गाण्यावर ठुमके लावताना दिसत आहे. तमन्ना अशा अंदाजात डान्स करीत आहे की, कोणीही तिच्या प्रेमात पडेल. सध्या तमन्नाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, चाहते त्यास प्रचंड प्रमाणात पसंत करीत आहेत. 

डीजे स्नेकने या व्हिडीओविषयी सांगितले की, ‘मला भारतात शूटिंग करताना आनंद वाटला. यावेळी मी भारतीय संस्कृतीचा अनुभव घेतला. भारत मला नेहमीच आवडतो. दरम्यान, बाहुबलीची अभिनेत्री असलेल्या तमन्ना भाटियाला मजेंटा रिदिमच्या संगीतावर देशी अंदाजात ठुमके लावताना बघणे खरोखरच मजेशीर आहे. भारतीय संस्कृतीचे एवढे रूपं बघून मला खरोखरच खूप आनंद झाला आहे. 
 

दरम्यान, या व्हिडीओची सुरुवात डीजे स्नेकच्या भारत शूटिंग दरम्यान झाली होती. डीजे स्नेकने ‘बाहुबली-२’ हा चित्रपट बघितला होता. हा चित्रपट तमन्नानेच त्याला पाठविला होता. कारण ती हैदराबादमध्ये त्याला भेटू शकली नव्हती. याविषयी तमन्नाने सांगिंतले की, मी गाणे ऐकले होते आणि मला ते खूपच आवडले होते. त्यानंतर डीजे स्नेक आणि माझ्यात बरीचशी चर्चा झाली होती. पुढे मी त्याला या गाण्याविषयी माझी फिलिंग सांगितली. त्यानंतर डीजे स्नेकने तमन्नाला या गाण्यावर डान्स करण्याचे एक चॅलेंज दिले. 
 

दरम्यान, तमन्ना डीजे स्नेकचे हे चॅलेंज स्वीकारताना या गाण्यावर आपला देशी अंदाज दाखविला. या अगोदर मजेंटा रिदिमवर आधारित एका व्हिडीओमध्ये जेठालाल आणि दयाबेन यांचा एक डान्स मिक्सवाला व्हिडीओ डीजे स्नेकने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. 
Web Title: 'Bahubali' actress used to indulge in foreign indigenous tomatoes, and fans became wounded!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.