बदला या चित्रपटाची घोडदौड सुरूच, बॉक्स ऑफिसवर कमावले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 12:30 PM2019-04-14T12:30:16+5:302019-04-14T12:31:48+5:30

बदला हा चित्रपट 8 मार्च 2019 ला प्रदर्शित झाला होता. इतके आठवडे उलटूनही या चित्रपटाला आजही प्रेक्षक गर्दी करत आहेत.

Badla crosses 100 crore mark! | बदला या चित्रपटाची घोडदौड सुरूच, बॉक्स ऑफिसवर कमावले इतके कोटी

बदला या चित्रपटाची घोडदौड सुरूच, बॉक्स ऑफिसवर कमावले इतके कोटी

googlenewsNext
ठळक मुद्देया चित्रपटाने पाचव्या आठवड्याच्या शुक्रवारी 30 लाख, शनिवारी 55 लाख, रविवारी 72 लाख, सोमवारी 20 लाख, मंगळवारी 20 लाख, बुधवार 20 लाख, गुरुवार 20 लाख रुपयांचे कलेक्शन करत 100 कोटींचा टप्पा पार केला.

अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांची मुख्य भूमिका असलेल्या बदला या चित्रपटाचे समीक्षकांनी चांगलेच कौतुक केले. या चित्रपटाला प्रेक्षकांचा देखील खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. बदला हा चित्रपट 8 मार्च 2019 ला प्रदर्शित झाला होता. इतके आठवडे उलटूनही या चित्रपटाला आजही प्रेक्षक गर्दी करत आहेत. या चित्रपटाने आता 100 कोटींचा पल्ला पार केला आहे. 

बदला या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 38 कोटी, दुसऱ्या आठवड्यात 29.32 कोटी, तिसऱ्या आठवड्यात 11.12 कोटी तर चवथ्या आठवड्यात 5.25 कोटी कमावले. या चित्रपटाने पाचव्या आठवड्याच्या शुक्रवारी 30 लाख, शनिवारी 55 लाख, रविवारी 72 लाख, सोमवारी 20 लाख, मंगळवारी 20 लाख, बुधवार 20 लाख, गुरुवार 20 लाख रुपयांचे कलेक्शन करत 100 कोटींचा टप्पा पार केला.



 

बदला हा चित्रपट एका मर्डर मिस्ट्रीवर आधारित असून एका खूनाच्या आरोपात तापसी अडकते. यातून वकीलाच्या भूमिकेत असलेले अमिताभ बच्चन तापसीला बाहेर कसे काढतात हे चित्रपटात पाहायला मिळते.  ‘कहानी’ चित्रपटाचे दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. शाहरूखच्या रेड चिली एंटरटेनमेंटने हा चित्रपट प्रोड्यूस केला आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्याही खूप अपेक्षा होत्या आणि आता या चित्रपटाला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देखील देत आहेत.  

बदला हा चित्रपट सुपरहिट झाला असला तरी या चित्रपटाला मिळालेल्या यशाकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केले असल्याची खंत अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी  सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केली होती. या चित्रपटाच्या यशाची निर्माते, डिस्ट्रीब्यूट तसेच बॉलिवूड मधील कोणत्याही व्यक्तीने दखल घेतली नाही असे अमिताभ यांचे म्हणणे आहे. अमिताभ यांनी ट्वीट करून याबाबत त्यांचे मत व्यक्त केले होते. त्यांच्या या ट्वीटवर या चित्रपटाचा निर्माता शाहरुख खानने लगेचच रिप्लाय दिला होता. त्याने ट्वीटमध्ये म्हटले होते की, सर, तुम्ही आम्हाला पार्टी कधी देत आहात याची आम्ही आतुरतेने वाट पाहात आहोत. आम्ही रोज रात्री जलसाच्या बाहेर यासाठी उभे देखील असतो.  



 

Web Title: Badla crosses 100 crore mark!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.