'Bachchre Girl', 'Superhit' movie of 'Superheroes', in Wani Kapoor's hands! | ‘बेफिक्रे गर्ल’ वाणी कपूरच्या हाती लागला दोन ‘सुपरहिरों’चा ‘सुपरहिट’ चित्रपट!

वाणी कपूर सध्या कुठेयं? (आता प्लीज, वाणी कपूर कोण? असे विचारू नका. अहो, तीच. रणवीर सिंगसोबत ‘बेफिक्रे’मध्ये दिसलेली हॉट अ‍ॅण्ड ग्लॅमरस ‘बेफिक्रे गर्ल’.) तर वाणी कपूर सध्या कुठेयं? हे आम्हाला ठाऊक नाही. पण येत्या दिवसांत वाणी कपूर कुठे असणार, हे मात्र आम्ही तुम्हाला सांगू शकणार आहोत. होय, काही दिवसांपूर्वी यशराज फिल्म्सने टायगर श्रॉफ व हृतिक रोशन यांना सोबत घेऊन येत असल्याची घोषणा केली होती. यशराज फिल्म्सने अचानक केलेल्या या घोषणेमुळे केवळ प्रेक्षकचं नाही तर अख्ख्या बॉलिवूडलाही आश्चर्याचा धक्का बसला होता. हृतिक आणि टायगर हे दोघेही डान्स ते अ‍ॅक्शनपर्यंत सगळ्याच गोष्टीत माहिर. अशात हे दोघे एकत्र आले तर चित्रपट सुपरडुपर हिट होणे अगदी आलेच. आता तुम्ही म्हणाल, हृतिक व टायगरच्या या चित्रपटाचा अन् वाणी कपूरचा काय संबंध? तर संबंध आहे. होय, हृतिक व टायगरच्या याच अ‍ॅक्शनपटात वाणी कपूरची वर्णी लागल्याची खबर आहे. म्हणजेच येत्या काळात वाणी कपूर या दोघांसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. यासोबतची आणखी एक मोठी बातमी म्हणजे, या चित्रपटात एकच हिरोईन असणार आहे आणि ही हिरोईन हृतिक रोशनसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे.ALSO READ : ‘या’ कारणामुळे वाणी कपूरच्या वडिलांना लवकरात लवकर उरकायचे तिचे लग्न!

चित्रपटाचे ​दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. चित्रपटाचा संपूर्ण भार हृतिक व टायगरच्या खांद्यावर असणार आहे. त्यामुळे चित्रपटात एकच हिरोईन असेल. ती हृतिकसोबत रोमान्स करताना दिसेल. मी या हिरोईनच्या भूमिकेसाठी एका फ्रेश चेहºयाच्या शोधात होतो. अखेर माझा हा शोध वाणी कपूरपर्यंत येवून थांबला, असे आनंद यांनी सांगितले. वाणी एक गुणी अभिनेत्री आहे. तिच्यातील डान्सिंग स्किल्स जबरदस्त आहे. आत्तापर्यंत दोन चित्रपटांत ती दिसली असली तरी या दोन्ही चित्रपटांत तिने तितकाच जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे, असेही आनंद म्हणाले.
एकंद काय तर वाणीला यशराजच्या आणखी एका चित्रपटाची लॉटरी लागली आहे. आता हा चित्रपट वाणीच्या करिअरला कसे वळण देते, ते बघूच.
Web Title: 'Bachchre Girl', 'Superhit' movie of 'Superheroes', in Wani Kapoor's hands!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.