Bachchan came to the family, Navhadhu, Sanjay Bachchan family came together for the war. | बच्चन कुटुंबात आली नववधू, जंगी स्वागतासाठी एकत्र आलं सारं बच्चन कुटुंब... शाही लग्नाचे खास फोटो आले समोर

हिंदी चित्रपटसृष्टीत मानाचं आणि प्रतिष्ठेचे स्थान असलेले कुटुंब म्हणजे बच्चन कुटुंब. बच्चन सिर्फ नाम ही काफी है असं म्हटलं जातं. महानायक बिग बी अमिताभ बच्चन, त्यांची पत्नी जया बच्चन, अभिनेता अभिषेक बच्चन आणि सून अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन यामुळे बच्चन कुटुंब कायमच प्रसिद्धीच्या झोतात असतं. बच्चन कुटुंबाशी संबधित कोणतीही गोष्ट असेल तर त्याची चर्चा आपसुकच होते. या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर सा-यांच्या नजरा खिळलेल्या असतात. नुकतंच बच्चन कुटुंबीय एका शुभकार्यात व्यस्त होते. 11 नोव्हेंबर आणि 12 नोव्हेंबर रोजी बच्चन कुटुंबीयांच्या नात्यात एका विवाहसोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी सारं बच्चन कुटुंब एक्साईटेड होतं. खुद्द बिग बी अमिताभ हेसुद्धा या लग्नाबाबत खूप उत्साही आणि एक्साईटेड होते. या लग्न सोहळ्याचे काही फोटो समोर आले आहेत. अमिताभ बच्चन, त्यांच्या पत्नी जया, मुलगा अभिषेक, मुलगी श्वेता नंदा, अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या आणि नात आराध्या असे सारं बच्चन कुटुंबीय एका फ्रेममध्ये पाहायला मिळाले. ऐश्वर्या आणि आराध्या या मायलेकींचा अंदाजही कुणालाही घायाळ करणारा असाच होता. दोघींनी गुलाबी रंगाचे ड्रेस परिधान केले होते. बिग बी आणि ज्युनियर बी म्हणजेच अभिषेक बच्चन यांनी शेरवानी परिधान केली होती. जया बच्चन आणि त्यांची लेक श्वेता नंदा यांचा अंदाजही तितकाच खास होता. दोघीही रॉयल अशा अंदाजात यावेळी पाहायला मिळाल्या. या दोघींनी अबू जानी आणि संदीप खोसला यांनी डिझाईन केलेला ड्रेस परिधान केला होता. खुद्द बिग बी अमिताभ बच्चन यांनीही या लग्न सोहळ्याबाबतची पोस्ट आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. एका लग्न सोहळ्याच्या निमित्ताने सारं कुटुंब एकत्र. आमच्या कुटुंबातील एका नववधूचं स्वागत करणं हे त्यामागचं कारण अशी पोस्ट बिग बींनी शेअर केली होती.  

Also Read:​असा साजरा झाला बच्चन कुटुंबाची ‘प्रिन्सेस’ आराध्याचा वाढदिवस!
Web Title: Bachchan came to the family, Navhadhu, Sanjay Bachchan family came together for the war.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.