'Baby Doll' Fame, Kanika Kapoor has filed a cheating case! | ‘बेबी डॉल’ फेम कनिका कपूरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल!

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनीने २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रागिनी एमएमएस-२’ या चित्रपटात ‘बेबी डॉल’ या गाण्यावर जोरदार ठुमके लावले होते. त्यावेळी हे गाणे प्रेक्षकांच्या जबरदस्त पसंतीस आले होते. त्याचबरोबर या गाण्याला आवाज दिलेली गायिका कनिका कपूरही त्यावेळी रातोरात चर्चेत आली होती. पुढे तर या गाण्याने कणिकाला प्रचंड स्टारडम आणि ग्लॅमर मिळवून दिले. मात्र आता तिच्या या स्टारडमला धक्का लागताना दिसत आहे. होय, बेबी डॉलच्या या गायिकेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी आग्रा येथील अलीगढमध्ये कनिका आणि तिच्या व्यवस्थापकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नोएडा स्थित एका इव्हेंट मॅनेजमेंट फर्मने कनिकाविरोधात ही तक्रार दाखल केली. टाइम्स आॅफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, बाना देवी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी जितेंद्र सिंग यांनी सांगितले की, कनिका, तिची मॅनेजर श्रुती आणि मुंबई स्थित इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे मॅनेजर संतोष मिजगर यांच्याविरोधात ४२० (फसवणूक), ४०६ (विश्वासघात) आणि ५०७ (धमकी) या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, मनोज शर्माच्या फर्मने कनिका कपूरला २२ जानेवारी रोजी अलीगढमध्ये एका प्रदर्शनात परफॉर्मन्स करण्यासाठी २४.९५ लाख दिले होते. परंतु कनिकाने याठिकाणी परफॉर्मन्स तर केला नाहीच, शिवाय पैसेही परत केले नाही. 

मनोज शर्मानी सांगितले की, कनिकाविरोधात मानहानीचा दावाही दाखल करणार आहे. कारण कनिकाने ऐनवेळी परफॉर्मन्स रद्द केल्याने त्याची आणि त्याच्या फर्मची प्रतिष्ठा मलिन झाली आहे. दरम्यान, कनिका आता याप्रकरणी काय पवित्रा घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. कनिकाने ‘बेबी डॉल, लवली, चिट्टियां कलाइयां, बीट पे बूटी’ यांसारखे हिट गाणे गायिले आहेत. 
Web Title: 'Baby Doll' Fame, Kanika Kapoor has filed a cheating case!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.