'Babuji Slowly Walking' Fame Senior Actress Shakila Bano is behind the screen | 'बाबुजी धीरे चलना' फेम ज्येष्ठ अभिनेत्री शकिला बानो पडद्याआड

'लेके पहले पहले प्यार' आणि 'बाबूजी धीरे चलना' अशा हिट गाण्यांमुळे प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री शकीला यांचं निधन झालंय. 82 वर्षीय शकीला यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालंय. शकीला यांचे भाचे नासिर खान यांनी फेसबुक अकाऊंटवरुन याची माहिती दिली आहे. शकीला यांचा जन्म 1 जानेवारी 1935 रोजी झाला होता. बादशाह बेगम असं त्यांचं मूळ नाव होतं. त्यांना त्यांच्या काकूने सांभाळलं होतं. पन्नासच्या दशकात दास्तान या सिनेमातून शकीला यांनी रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर आरपार, सीआयडी, श्रीमान सत्यवादी, उस्तादों के उस्ताद, रेश्मी रुमाल या सिनेमातील अभिनेत्री शकीला यांच्या भूमिका गाजल्या. पन्नासहून अधिक सिनेमात शकीला यांनी काम केलं होतं. 1963 साली त्या विवाहबंधनात अडकल्या आणि त्यानंतर ब्रिटनमध्ये स्थायिक झाल्या. राजद्रोही या 1993 साली आलेल्या सिनेमातून त्यांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक केलं होतं. अखेर या अभिनेत्रीनं वयाच्या 82व्या वर्षी जगाचा निरोप घेतलाय.Web Title: 'Babuji Slowly Walking' Fame Senior Actress Shakila Bano is behind the screen
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.