‘कटप्पा’सोबत ऐश्वर्या राय करणार ऑनस्क्रिन रोमान्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 11:57 AM2019-04-18T11:57:06+5:302019-04-18T12:09:25+5:30

साऊथ स्टार सत्यराज संपूर्ण देशात केवळ एका भूमिकेमुळे लोकप्रिय झालेत. ही भूमिका होती, कटप्पाची. कटप्पाची भूमिका साकारणा-या याच सत्यराज यांच्यासोबत ऐश्वर्या राय बच्चन ऑनस्क्रिन रोमान्स करताना दिसणार आहे.

baahubalis kattappa aka sathyaraj may play aishwarya rais husband in mani ratnams next ponniyin selvan | ‘कटप्पा’सोबत ऐश्वर्या राय करणार ऑनस्क्रिन रोमान्स!

‘कटप्पा’सोबत ऐश्वर्या राय करणार ऑनस्क्रिन रोमान्स!

googlenewsNext
ठळक मुद्दे२०१८ मध्ये प्रदर्शित ‘फन्ने खां’ हा ऐश्वर्याचा अखेरचा बॉलिवूड सिनेमा होता. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. त्यापूर्वी ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये ऐश्वर्या दिसली.

साऊथ स्टार सत्यराज संपूर्ण देशात केवळ एका भूमिकेमुळे लोकप्रिय झालेत. ही भूमिका होती, कटप्पाची. होय, एसएस राजमौली यांच्या ‘बाहुबली’ व ‘बाहुबली 2’ या चित्रपटात सत्यराज यांनी साकारलेली कटप्पाची भूमिका लोकांनी इतकी डोक्यावर घेतली की, सत्यराज यांना कधी नव्हे इतकी लोकप्रियता मिळाली. कटप्पाची भूमिका साकारणा-या याच सत्यराज यांच्यासोबत आता ऐश्वर्या राय बच्चन ऑनस्क्रिन रोमान्स करताना दिसणार आहे.


होय, चर्चा खरी मानाल तर मणिरत्नम यांच्या ‘पोन्निनी सेल्वम’ या आगामी चित्रपटात सत्यराज यांची एन्ट्री झाली आहे. या सिनेमात ऐश्वर्या राय लीड रोलमध्ये असल्याचे कळतेय आणि ऐश्वर्याच्या पतीची भूमिका सत्यराज साकारणार, अशी चर्चा आहे. या सिनेमात ऐश्वर्या एका राजकुमारीच्या भूमिकेत झळकणार आहे. एका राजासोबत तिचे लग्न होते. पण राजकुमारी या लग्नाचा वापर केवळ आपल्या इच्छापूर्तींसाठी करते. एका तामिळ कादंबरीवर या चित्रपटाची कथा बेतलेली आहे.

चर्चेनुसार, मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोन्निनी सेल्वम’मध्ये ऐश्वर्यासोबत तिचे सासरे अमिताभ बच्चन हेही दिसू शकतात.अर्थात अद्याप अमिताभ आपल्या बिझी शेड्यूलमुळे  या चित्रपटाला होकार देऊ शकलेले नाहीत.‘पोन्निनी सेल्वम’मध्ये ऐश्वर्याच्या पतीची भूमिका आधी अभिनेते मोहनबाबू  साकारणार अशी चर्चा होती. त्यांनी या चित्रपटासाठी होकार दिल्याचेही म्हटले गेले होते. पण आता कदाचित त्यांच्याजागी सत्यराज यांची वर्णी लागली आहे. साहजिकच कटप्पा व ऐश्वर्याचा ऑनस्क्रिन रोमान्स कसा रंगतो, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.
२०१८ मध्ये प्रदर्शित ‘फन्ने खां’ हा ऐश्वर्याचा अखेरचा बॉलिवूड सिनेमा होता. पण बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फार कमाल दाखवू शकला नाही. त्यापूर्वी ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये ऐश्वर्या दिसली. हा चित्रपट सुपरडुपर हिट झाला. पण याचे श्रेय ऐश्वर्याऐवजी, अनुष्का शर्मा व रणबीर कपूरच्या नावावर चढले. अशात हा चित्रपट ऐश्वर्याच्या करिअरला किती गती देतो, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: baahubalis kattappa aka sathyaraj may play aishwarya rais husband in mani ratnams next ponniyin selvan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.