‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांचा मुलगा कार्तिकेयचा साखरपुडा! पाहा, फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 06:55 PM2018-09-06T18:55:43+5:302018-09-06T18:59:31+5:30

 साऊथ स्टार जगपती बाबू यांची भाची पूजा प्रसादसोबत कार्तिकेयचा साखरपुडा झाला. या छोटेखानी समारंभास राजमौलींचे जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते. 

baahubali director s s rajamouli son karthikeya engaged to pooja prasad | ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांचा मुलगा कार्तिकेयचा साखरपुडा! पाहा, फोटो!!

‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांचा मुलगा कार्तिकेयचा साखरपुडा! पाहा, फोटो!!

googlenewsNext

बाहुबली’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे दिग्दर्शक एस एस राजमौली यांचा मुलगा कार्तिकेय सध्या चर्चेत आहे. चर्चेत यासाठी की़, राजमौलींच्या या चिरंजीवाचा नुकताच साखरपुडा पार पडला. साऊथ स्टार जगपती बाबू यांची भाची पूजा प्रसादसोबत कार्तिकेयचा साखरपुडा झाला. या छोटेखानी समारंभास राजमौलींचे जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते. 

साऊथ सुपरस्टार नागार्जुनचा लहान मुलगा अखिल अक्किनेनी याचे नावही पाहुणे मंडळींच्या यादीत होते. खुद्द कार्तिकेयने आपल्या साखरपुड्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. 



आयुष्याचा हा नवा टप्पा सुरू करताना मी प्रचंड उत्सूक आहे. मला खूप सारे प्रेम दिल्याबद्दल आभार. सगळ्यांचे आभार मानू शकत नाही. पण सगळ्यांसाठी प्रेम, असे ट्विट त्याने केले. सोबत मंगेतर पूजासोबतचा एक गोड फोटोही शेअर केला.


कार्तिकेयने ‘बाहुबली’चा चित्रपटाचा युनिट डायरेक्टर म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय त्याचा स्वत:चाही बिझनेस आहे. तो एक रेस्टॉरंट आणि तेलंगणा प्रीमिअर कबड्डीच्या नालगोंडा इगल्स टीमचा भागीदारही आहे. पूजाबद्दल सांगायचे तर ती एक लोकप्रीय गायिका आहे. पूजाने साऊथ इंडस्ट्रीत अनेक गाणी गायली आहेत. यावर्षी डिसेंबरमध्ये हे जोडपे लग्नबंधनात अडकणार असल्याचे कळतेय.
‘बाहुबली’सारखा मेगाब्लॉकबस्टर चित्रपट देणारे दिग्दर्शक राजमौली सध्या ‘आरआरआर’ चित्रपटात बिझी आहेत. या चित्रपटात ज्युनिअर एनटीआर आणि रामचरण तेजा मुख्य भूमिकेत आहेत. ३०० कोटींचा बजेट असलेला हा चित्रपट २०२० मध्ये मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.

Web Title: baahubali director s s rajamouli son karthikeya engaged to pooja prasad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.