‘बाहुबली’ फेम प्रभास तिकडे ‘साहो’ या सिनेमात बिझी आहे आणि इकडे त्याच्याबद्दलची एक ‘हॉट’ बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. होय, ही खबर कुठली तर ‘बिग बॉस’च् फेम अर्शी खानला प्रभासचा चित्रपट मिळाल्याची. होय, ‘बिग बॉस’च्या घरात ‘मोस्ट एंटरटेनिंग कंटेस्टंट’ म्हणून प्रसिद्ध झालेली ‘आवाम की जान’ अर्शी  खान हिच्या हाती एक मोठा चित्रपट लागल्याची बातमी आम्ही कालच तुम्हाला  दिली होती.  खुद्द अर्शी खानने एक tweetकरून ही माहिती दिली होती.  #ArshiKhan signed on for a big film in main lead starring mega star Prabhas. Thank you @BeingSalmanKhan @ColorsTV @EndemolShineIND @BiggBoss @rajcheerfull #AbhishekRege Special thanks to #NevadaPutman असे  tweet अर्शीने केले होते. पण कदाचित अर्शीच्या या बातमीवर ‘अवाम’चा विश्वास बसलेला दिसत नाहीये. अर्शीच्या  twitterवर लोकांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहून तरी हेच वाटते. यानिमित्ताने लोकांनी अर्शीला चांगलेच ट्रोल केले आहे. अनेकांनी हा अर्शीचा पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटले आहे. काही युजर्सनी तर अर्शीची चांगलीच टर उडवली आहे. अद्याप अर्शीच्या प्रभाससोबतच्या आगामी चित्रपटाचे नाव काय, त्यात तिची भूमिका काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.  चर्चा खरी मानाल तर लवकरच अर्शी एका रिअ‍ॅलिटी शोमध्येही दिसणार आहे. ‘बिग बॉस’मध्ये मजेशीर अंदाजात प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यावर ती नव नव्या आव्हानांशी लढताना दिसेल. होय, अर्शी लवकरच ‘खतरों के खिलाडी’च्या नवव्या सीझनमध्ये दिसू शकते, असे कळतेय. अर्शी कॉमन मॅन बनून ‘बिग बॉस’च्या घरात पोहोचली होती. सध्या अर्शी आपल्या फिटनेसवर सर्वाधिक लक्ष देत आहे. जिममध्ये ती तासन तास घाम गाळत आहे. आता ही तयारी तिच्या चित्रपटासाठी आहे की ‘खतरों के खिलाडी’च्या सीझन ९ साठी आहे, हे तिलाच ठाऊक़  


ALSO READ : 
‘अवाम की जान’ अर्शी खानला लागली लॉटरी! मिळाला ‘बाहुबली’ प्रभासचा चित्रपट !!

‘खतरों के खिलाडी’च्या मागच्या सीझनमध्ये मनवीर गुर्जर आणि लोपामुद्रा राऊत हे दोघे ‘बिग बॉस’चे एक्स कटस्टंट खतरनाक स्टंट करताना दिसले होते. आता अर्शी काय करते ते बघूच. एंटरटेनमेंटच्या बाबतीत अर्शी कुठेही कमी नाही पण स्टंट करताना तिचा किती टीकाव लागतो, ते लवकरच कळेल.
Web Title: 'Awam' took Arashi Khan's spin! Social media hoaxed!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.