Atul Kulkarni is refusing to give such a bold film that the sensor board will listen to the name !! | ​अतुल कुलकर्णी करतोय इतका बोल्ड चित्रपट की, नाव ऐकताचं सेन्सॉर बोर्ड देणार नकार!!
​अतुल कुलकर्णी करतोय इतका बोल्ड चित्रपट की, नाव ऐकताचं सेन्सॉर बोर्ड देणार नकार!!
बॉलिवूडमध्ये निवडक चित्रपट करणारा मराठी अभिनेता म्हणजे, अतुल कुलकर्णी. होय, १९९९ मध्ये आलेल्या ‘चांदनी बार’ या हिंदी चित्रपटात पहिल्यांदा अतुलच्या दमदार अभिनयाची झलक पाहायला मिळाली. यानंतर अलीकडे आलेल्या शाहरूख खान स्टारर ‘रईस’ या चित्रपटातही अतुलने दमदार भूमिका साकारली. पण आता अतुल तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही, इतक्या बोल्ड चित्रपटात दिसणार आहे.  या चित्रपटाबद्दल ऐकून सेन्सॉर बोर्डाचेही कान टवकारतील, इतका हा चित्रपट बोल्ड आहे. होय, अतुलचा हा चित्रपट एक ‘थ्रीसम’ चित्रपट आहे. हा चित्रपट बॉलिवूडचा दुसरा ‘थ्रीसम’ चित्रपट असेल. यापूर्वी २०१६ मध्ये ‘इश्क जुनून’ नामक ‘थ्रीसम’ चित्रपट आला होता.   अमोल काळे हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. यात अतुल एका स्वतंत्र आणि खुल्या विचाराच्या चित्रकाराची भूमिका साकारताना दिसणार आहे. दिग्दर्शक अमोलचे मानाल तर, या आगामी चित्रपटात तीन गोष्टी प्रामुख्याने असतील, त्या म्हणजे, ‘इमोशन, सेक्स आणि फायनान्स’. ‘इमोशन, सेक्स आणि फायनान्स’ या तिन्ही गोष्टींसह चित्रपट बनवण्याची कल्पना मला आवडली.अतुल पहिल्यांदा अशा सेक्युअल चित्रपटात काम करणार आहे. यात किरण थापर आणि सबा सौदागर या दोघी जणी फिमेल लीडमध्ये असतील. या दोघीही सख्ख्या बहिणींची भूमिका साकारतील. चित्रपटात  अतुल विवाहित असेल. महमूद खान नामक व्यक्तिरेखा तो यात साकारताना दिसेल, असे  त्याने सांगितले.

ALSO READ : SEE PICS:असं आहे अतुल कुलकर्णीचे फार्महाऊस !

 अतुल कुलकर्णी पहिल्यांदा इतका बोल्ड चित्रपट करणार असला तरी, याबद्दल त्याच्या मनात कुठलाही संभ्रम नाही. अशी भूमिका करण्यात मला कुठलीही लाज नाही. एक अभिनेता या नात्याने माझ्या वाट्याला ज्या कुठल्या भूमिका येतील, त्या मी साकारेल. मग ती खलनायकाची असो, विनोदी असो किंवा सेक्शुअल व बोल्ड असो. आमच्या या चित्रपटावर सेन्सॉर बोर्ड कसे रिअ‍ॅक्ट होतो, ते आम्हाला ठाऊक नाही. पण आम्ही सेन्सॉर बोर्डाशी निपटण्यास तयार असू,असे तो म्हणतो. एकंदर काय तर, या चित्रपटामुळे सेन्सॉर बोर्ड विचलित होऊ शकते. पण अतुलने हे आव्हान स्वीकारले आहे. आता केवळ अतुलची ही बोल्ड  भूमिका पे्रक्षकांच्या किती गळी उतरते, ते बघू.
Web Title: Atul Kulkarni is refusing to give such a bold film that the sensor board will listen to the name !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.