Asked about the relation with X-Wife Malaika Arora, Arbaaz Khan gave the answer! | एक्स वाइफ मलाइका अरोरासोबतच्या रिलेशनबद्दल विचारताच अरबाज खानने दिले हे उत्तर!

अभिनेता अरबाज खान आणि सनी लिओनी स्टारर ‘तेरा इंतजार’ हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे. सध्या हे दोघे चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून, विविध शोमध्ये हजेरी लावून हे दोघे त्यांच्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करीत आहेत. नुकताच या दोघांनी याचसंदर्भात मीडियाशी संवाद साधला. अरबाजने त्याच्या चित्रपटाबरोबरच एक्स वाइफ मलाइका अरोरा हिच्यासोबतच्या नात्याविषयी विचारलेल्या प्रश्नांचीही उत्तरे दिली. 

एका प्रश्नाचे उत्तर देताना अरबाजने सांगितले की, ‘मी आणि मलाइका १८ वर्षांपेक्षा अधिक काळ एकत्र राहिलो. आमचा घटस्फोट झाला, परंतु आम्ही अजूनही चांगले मित्र आहोत.’ याच वर्षाच्या मे महिन्यात या जोडप्याचा घटस्फोट झाला. पुढे बोलताना अरबाज म्हणाला की, ‘मलाइका आजदेखील माझ्यासाठी फॅमिलीप्रमाणे आहे. आमचा एक अरहन नावाचा मुलगा असून, त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी आमच्या दोघांवरही आहे.’ दुसºया लग्नाबाबत जेव्हा अरबाजला विचारण्यात आले तेव्हा त्याने दुसºया लग्नासाठी माझ्याकडे वेळ नसल्याचे सांगितले. अरबाजने म्हटले की, ‘सध्या मी चित्रपटांना प्रोड्यूस करण्यात व्यस्त आहे. मी एक प्रोड्यूसर म्हणून ‘दबंग’ सीरिजचे चित्रपट आणि ‘डॉली की डोली’ प्रोड्यूस केली आहे. पुढच्या वर्षी मी ‘दबंग-३’च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. त्यामुळे दुसरे लग्न करण्यासाठी माझ्याकडे सध्यातरी पुरेसा वेळ नाही.’ सनी लिओनीसोबत काम करण्याच्या अनुभवाविषयी अरबाजने सांगितले की, ‘सनीसोबत काम करण्यास खरंच खूप मजा आली. जर मला पुन्हा सनीसोबत काम करण्यास मिळाले तर मी नक्कीच त्याबाबत विचार करेल. सनी एक चांगली अभिनेत्री आहे. ‘दबंग-३’च्या कथेनुसार जर गरज भासल्यास सनी लिओनीला संधी देण्याचा मी नक्की विचार करणार.’

दिग्दर्शक राजीव वालिया यांचा ‘तेरा इंतजार’ हा चित्रपट येत्या २४ नोव्हेंबर रोजी रिलीज होत आहे. चित्रपटात अरबाज, सनी व्यतिरिक्त सलिल अंकोला, सुधा चंद्रन, आर्य बब्बर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचा ट्रेलर आणि ‘एकाध’ हे गाणे आतापर्यंत रिलीज झाले आहेत. त्यास प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला आहे. 
Web Title: Asked about the relation with X-Wife Malaika Arora, Arbaaz Khan gave the answer!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.