Ashok Vari to make Dhanush's 'Visaranai' | धनुषचा ‘विसारानाई’ करणार आॅस्कर वारी

अनेक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरणारा ‘विसारानाई’ हा तामिळपट सन २०१७ च्या आॅस्कर पुरस्कार शर्यतीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. पुढील वर्षीच्या आॅस्कर पुरस्कारासाठी विदेशी भाषा विभागासाठी भारताकडून ‘विसारानाई’ हा चित्रपट पाठवला जाणार आहे. रांझणा’मधला ‘लव्हरबॉय’ धनुष याची निर्मिती असलेला‘विसारानाई’ हा एक क्राईम-थ्रिलर सिनेमा आहे. वेत्रिमारन दिग्दर्शित हा चित्रपट एम. चंद्रकुमार यांच्या लॉक अप या कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटात पोलिसांचे क्रौर्य, भ्रष्टाचार आणि निर्दोष व्यक्तींचा अन्यायाविरूद्धचा संघर्ष दाखवला आहे. खोट्या गुन्ह्यांत अडकवण्यात आलेल्या चार निरपराध मजुरांच्या लढ्याची ही कथा आहे. ५ फेबु्रवारीला तामिळनाडूत हा चित्रपट रिलीज झाला होता आणि प्रेक्षक, समीक्षकांनी तो डोक्यावर घेतला. यंदाच्या ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटासह तीन पुरस्कार पटकावले होते. आॅस्करवारीसाठी निवड झाल्याने ‘विसारानाई’ची अख्खी टीम आनंदात आहे. धनुष याने हा आम्हा सर्वांसाठी अत्यंत सन्मानाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गतवर्षी ‘कोर्ट’ हा मराठीपट आॅस्करवारीसाठी गेला होता. यंदा ‘विसारानाई’ या तामिळपटाची आॅस्करवारीसाठी निवड झाली आहे. 


 
Web Title: Ashok Vari to make Dhanush's 'Visaranai'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.