Ash is ready to work with Salman; But the only one !! | ​ सलमानसोबत काम करण्यास ऐश तयार; पण अट एकच!!

ऐश्वर्या रॉय ‘ऐ दिल है मुश्किल’च्या प्रमोशनसाठी सलमान खानच्या ‘बिग बॉस’च्या घरात जाणार का? सध्या याकडेच सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ऐश्वर्या आणि ‘ऐ दिल है मुश्किल’मधील तिचा को-स्टार रणबीर कपूर दोघांचेही सलमानची जमत नाही. ऐश्वर्या व सलमान यांच्याबद्दल तर सर्वांनाच ठाऊक आहे. तरिही बॉलिवूडमधील चर्चा खरी मानाल तर,  ऐश्वर्या या शोमध्ये प्रमोशनसाठी जाऊ शकते. अर्थात या शोमध्ये तिने प्रमोशनसाठी जावे, याबद्दल तिच्यावर कुठलाही दबाव नाही. आता तुम्ही म्हणाल, आम्ही हे इतक्या दाव्यानिशी कसे सांगतोय, तर ऐश्वर्याने अलीकडे व्यक्त केलेल्या भावना. चित्रपटाची स्क्रीप्ट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक  असेल तर सलमानसोबत काम करण्यासही ऐश्वर्याला काहीही हरकत नाही,असे ऐश्वर्याने बोलून दाखवले आहे. अलीकडे प्रकाशित एका लेखात तसा दावा करण्यात आला आहे. आता ऐश्वर्या इतकी प्रोफेशन झाली असेल तर ‘बिग बॉस’मध्ये हजेरी लावण्यास तिची काय हरकत असणार?
 
Web Title: Ash is ready to work with Salman; But the only one !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.