Armaan Kohli kills Kajol sister Tania Mukherjee? | ​अरमान कोहलीने काजोलची बहीण तनीषा मुखर्जीलाही केली होती मारहाण??

दिग्दर्शक व अभिनेता अरमान कोहली याच्यावर अनेकदा गर्लफ्रेन्डला मारहाण करण्याचे आरोप  झाले आहेत. सध्या अरमान याच आरोपामुळे चर्चेत आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. प्रेयसी नीरू रंधावाने त्याच्याविरोधात पोलिसांत मारहाण केल्याची तक्रार दाखल केली होती. यानंतर अरमान अनेक दिवस फरार होता. नीरूने केस मागे घेण्याची तयारी दाखवल्यावर तो परतला़ होता. पण न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिल्याने सध्या तो २६ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहे.
याआधी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम मुनमून दत्ता हिने अरमानवर मारहाणीचा आरोप केला होता. अभिनेत्री काजोलची बहीण तनीषा मुखर्जी हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना अरमानने तिलाही मारहाण केली होती, अशी माहिती आता समोर येत आहे. खुद्द नीरू रंधावाने तसा दावा केला आहे.
स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत अरमानची लिव्ह इन पार्टनर नीरू रंधावाने हा दावा केला आहे. अरमानने तनीषावरही हात उचलला होता. मला नोकरांकडून ही बाब कळली, अरमान तनीषाला मारहाण करायचा, हे  तनीषाच्या काही मित्रांनीही मला सांगितले, असे नीरू या मुलाखतीत म्हणाली.
तुम्हाला माहित असेलचं की, अरमान व तनीषा यांचे अफेअर ‘बिग बॉस7’मध्ये सुरू झाले होते. या शोदरम्यान त्यांच्यात निर्माण झालेली जवळीक अख्ख्या देशाने पाहिली होती. तनीषाची बहीण काजोल आणि आई तनुजा यामुळे अपसेट असल्याच्या बातम्याही त्याकाळात आल्या होत्या. बिग बॉसच्या घरात अरमान अन्य स्पर्धकांसोबतही हिंसक होताना दिसला होता. पण तनीषासोबत मात्र त्याचे चांगलेच सूर जुळले होते. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतरही काही काळ तनीषा व अरमानचे अफेअर सुरू होते. पण नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. कदाचित अरमानच्या हिंसक स्वभावचं याला कारणीभूत ठरला.
नीरू रंधावाने दिलेल्या माहितीनुसार, गतवर्षी डिसेंबरमध्येचं तिने अरमानपासून वेगळे होण्याचा प्रयत्न केला  होता. कारण अरमानने तिच्यावर अनेकदा हात उचलला होता. गत फेबु्रवारीत त्याने तिला बेदम मारहाण केली होती. यात तिच्या नाकाला दुखापत झाली होती. यानंतर गत ३ जूनला अरमानने नीरूला पुन्हा अशीच बेदम मारहाण केली. यात नीरूच्या डोक्याला, गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. तिला कोकिळाबेन रूग्णालयात दाखल करण्यात आल्यावर रूग्णालयाने यासंदर्भात पोलिसांना कळवले.
नीरूने मुलाखतीत सांगितल्यानुसार, आता अरमान तिच्यासोबत पॅचअप करण्याचा प्रयत्न करतोय. त्याने तिला लग्नाचे वचनही देऊ केले आहे.  

ALSO READ : ​सलमान खानच्या या लाडक्या मित्राच्या विरोधात दाखल करण्यात आला गुन्हा... प्रेयसीला केली बेदम मारहाण

अरमानने नव्वदीच्या दशकात अनेक चित्रपटात काम केले आहे. पण त्याचा कोणताच चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी होऊ शकला नाही. त्याने काही वर्षांपूर्वी प्रेम रतन धन पायो या चित्रपटात काम केले होते. पण त्याच्या अभिनयाची तितकीशी चर्चा झाली नाही. अरमान हा सर्वात जास्त प्रसिद्ध बिग बॉस या कार्यक्रमामुळेच झाला. बिग बॉसच्या घरात असताना सगळ्यांशी भांडणे, सगळ्यांवर उगाचच ओरडणे, स्वतःच्या रागावर नियंत्रण नसणे या सगळ्या गोष्टींमुळे तो प्रचंड फेमस झाला होता. 
Web Title: Armaan Kohli kills Kajol sister Tania Mukherjee?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.