अर्जुन कपूर ह्या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये दिसणार निगेटिव्ह भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 10:00 PM2018-11-22T22:00:00+5:302018-11-22T22:00:00+5:30

'एक व्हिलन' चित्रपटाचा सीक्वल बनणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

Arjun Kapoor will be play negative role in Ek villain Sequel | अर्जुन कपूर ह्या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये दिसणार निगेटिव्ह भूमिकेत

अर्जुन कपूर ह्या चित्रपटाच्या सीक्वलमध्ये दिसणार निगेटिव्ह भूमिकेत

googlenewsNext
ठळक मुद्दे'एक व्हिलन' चित्रपटाचा येणार सीक्वल

२०१४ साली 'एक व्हिलन' चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख व श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. यात रितेश देशमुख निगेटिव्ह भूमिकेत होता. रितेशने पहिल्यांदाच निगेटिव्ह भूमिका साकारली होती. रितेशची निगेटिव्ह भूमिकेचे सगळीकडे खूप कौतूक झाले होते.
आता या चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले जात आहे.

'एक व्हिलन' चित्रपटाचा सीक्वल अर्जून कपूर आणि सिद्धार्थच्या चाहत्यांसाठी अधिक खास असणार आहे. कारण या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच ही जोडी एकत्र रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. पहिल्या भागात रितेश देशमुखने व्हिलनची भूमिका साकारली होती. त्याची भूमिकादेखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली होती. मिळालेल्या माहितीनुसार आता या भागात अर्जून कपूर व्हिलनची भूमिका साकारणार असल्याने त्याच्या भूमिकेलाही प्रेक्षकांची तशीच पसंती मिळते का हे पाहणे रंजक ठरणार आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर करणार आहे.

अर्जुन लवकरच 'इंडियाज मोस्ट वान्टेड' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच त्याने पूर्ण केले आहे. हा सिनेमा देशभक्तीपर असल्याचे अर्जुनने सांगितले. या चित्रपटात तो गुप्त अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याने याबाबत सांगितले की, 'ही अतिशय भीतीदायक आणि वास्तविक कथा आहे. हा चित्रपट केल्यानंतर मी भारतीय असल्याचा मला अभिमान वाटतो आहे. या चित्रपटामुळे तुमच्या मनात देशभक्ती नक्की जागृत होईल. ही अशा नायकाची कथा आहे ज्याच्या शौर्याचे वर्णन अजूनपर्यंत झालेले नाही. अशा हिरोंचा सन्मान आणि प्रशंसा व्हायला हवी.'

Web Title: Arjun Kapoor will be play negative role in Ek villain Sequel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.