बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने आपल्या करिअरची सुरुवात २०१२ मध्ये ‘इश्कजादे’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात त्याच्या अपोझिट अभिनेत्री परिणिती चोपडा होती. चित्रपटात दोघांची चांगलीच जोडी जमली होती. त्यांचा हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट ठरला. शिवाय त्यांच्यातील मैत्रीचे किस्सेही सर्वदूर रंगू लागले. आता सहा वर्षांनंतर पुन्हा एकदा हे दोघे ‘नमस्ते इंग्लंड’ या चित्रपटात बघावयास मिळणार आहेत. सध्या हे दोन्ही स्टार चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, सेटवरील त्यांचे बरेचसे मजेशीर व्हिडीओ समोर आले आहेत. परिणितीने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये अर्जुन कपूर एका आजाराने ग्रस्त असल्याचे ती सांगताना दिसत आहे. 
 

परिणितीने शनिवारी अर्जुनचा एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये अर्जुन सेलिब्रेशनच्या मूडमध्ये दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये परिणितीने लिहिले की, ‘नाव-अर्जुन कपूर, वय-४ वर्ष, आजार- संताप आणणारे लक्षण, उपचार- उपलब्ध नाही.’ परिणितीच्या या पोस्टला रिपोस्ट करताना अर्जुनने लिहिले की, ‘अखेर परिणितीने हार मानली असून, माझे तिने जाहीरपणे कौतुक केले आहे. व्हिडीओमध्ये हे स्पष्ट होते की, दोघेही सेटवर एकमेकांची कंपनी चांगलीच एन्जॉय करीत आहेत. याअगोदरही सेटवरील अर्जुन आणि परिणितीचे बरेचसे व्हिडीओ समोर आले आहेत, त्यामध्ये दोघेही मौजमस्ती करताना दिसतात. 
 

परिणितीने अपलोड केलेल्या एका व्हिडीओमध्ये परिणिती आपल्या कॅमेरामॅनला एक फोटो क्लिक करायला सांगते, जसेही परिणिती फोटोसाठी पोज देते तोच अर्जुन तिला धक्का देतो. परिणिती अचानकच पुढे सरकते अन् पडता पडता स्वत:ला सावरते. अर्जुनची ही मस्करी बघून जवळ असलेल्या सर्व लोकांमध्ये एकच हशा पिकतो; मात्र यामुळे परिणितीला चांगलाच राग येतो. ती हलक्या हाताने अर्जुनच्या खाद्यांवर मारते. परिणितीचा हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात पसंत केला जात आहे. 
 

दरम्यान, ‘नमस्ते इंग्लंड’ हा चित्रपट २००७ मध्ये आलेल्या अक्षयकुमार आणि कॅटरिना कैफ स्टारर ‘नमस्ते लंडन’ या चित्रपटाचा सिक्वल आहे. विपुल शाह दिग्दर्शित हा चित्रपट १९ आॅक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 
Web Title: Arjun Kapoor, Parineeti Chopra shared the video by sharing this!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.