Arjun Kapoor and Parineeti Chopra complete the shooting of 'Sandeep and Pinky Fakhar' | अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्राने पूर्ण केली 'संदीप और पिंकी फरार'ची शूटिंग

'इश्कजादे' चित्रपटानंतर पुन्हा एकदा अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्राची जोडी मोठ्या पडद्यावर धमाल उडवून द्यायला तयार आहेत. लवकरच दोघे दिबाकर बनर्जींच्या संदीप और पिंकी फरारमध्ये दिसणार आहे. गतवर्षी या चित्रपटाची शूटिंग दिल्ली आणि इंडो-नेपाळच्या बॉर्डरवर सुरू झाली होती. शूटिंग दरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडिओंना परिणीती आणि अर्जुनने आपल्या फॅन्ससोबत सोशल मीडियावर शेअर केले होते. फोटो बघून अंदाजात येतोय की दोघांनी सेटवर खूप धमाल केली असेल.    
 अर्जुन कपूरने सोशल मीडियावर संदीप और पिंकी फरारची शूटिंग पूर्ण झाल्याचे सांगितले. अर्जुन ट्वीटर करताना लिहिले आहे की, मी माझ्या पहिल्या को-स्टार परिणीती चोप्रासोबत माझा 10 वा चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली आहे. परिणीती, दिबाकर बनर्जी आणि इतर टीमसोबत काम करणे खूपच छान होते. मला आशा आहे की 3 ऑगस्टला रिलीज होणार आमचा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. अर्जुनने या ट्वीटसोबत एक फोटो देखील शेअर केला आहे.   

ALSO RAED :  परिणीती चोप्राचे पॅचअप! एक्स-बॉयफ्रेन्डसोबत पुन्हा वाढल्या गाठीभेटी!!

हा चित्रपट भारत विरूद्ध इंडियाच्या कल्पनेवर आधारित असल्याचे त्याने सांगितले होते. गेल्या काही काळात आपला देश भारत विरूद्ध इंडिया अशा वेगळ्यात गुंत्यात फसलेला दिसतोय. दोन वेगवेगळ्या विचारधारांचा संघर्ष देशात पाहायला मिळतो आहे. ‘संदीप और पिंकी फरार’ हा चित्रपट याच विचारधारेवर बेतलेला असेल. समाजातील बदल लोकांच्या आयुष्यात कशी उलथापालथ घडवू शकतात, हे या चित्रपटात दिसेल, असे त्याने सांगितले होते. दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित या चित्रपटाच्या कथेबद्दल कमालीची उत्सुकता पाहायला मिळतेय. या चित्रपटातीची गोष्ट एका कॉरपोरेटमध्ये काम करणाऱ्या मुलीची आहे. जो आपल्या ध्येयाला घेऊन खूप फोक्स्ड असते. अर्जुन कपूर पोलिस कर्मचाºयाच्या भूमिकेत दिसणार आहे. 6 ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परिणीती आणि अर्जुनने इश्कजादे चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.  तब्बल 4 वर्षांनंतर दोघांची केमिस्ट्री पडद्यावर पाहण्यासाठी त्यांचे फॅन्स नक्कीच उत्सुक असतील यात काही शंका नाही.
Web Title: Arjun Kapoor and Parineeti Chopra complete the shooting of 'Sandeep and Pinky Fakhar'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.