Arica Kapoor has forgotten Malaika Arora; Proof of this! | अर्जुन कपूरला विसरणे मलाइका अरोराला होतेय अशक्य; हा घ्या पुरावा!

गेल्या काहीकाळापासून अभिनेत्री मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यातील नाते चर्चेत आहे. एवढेच काय तर अरबाज खान आणि मलाइकाच्या घटस्फोटाला अर्जुन कपूरच कारणीभूत असल्याचेही बोलले जात आहे. दोघांना नेहमीच एकत्र पार्टी करताना आणि विमानतळावर बघण्यात आले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोघांना एकदाही एकत्र बघण्यात आले नाही. याचे कारण असे की, पापा बोनी कपूरनेच अर्जुनला मलाइकापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. 

मात्र आता दोघांच्या अफेअरची बातमी पुन्हा एकदा वाºयासारखा पसरताना दिसत आहे. कारण काही दिवसांपूर्वी अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यास मलाइकाने लाइक केले होते. अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्रामवर रोनाल्डोसोबतचा एक फोटो पोस्ट केला होता. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले होते की, फुटबॉलच्या महान खेळाडूसोबत फुटबॉलविषयी बोलतानाचा अनुभव अविस्मरणीय होता. वृत्तानुसार, मलाइका अरोरासोबतच्या अफेअरच्या चर्चांमुळे सलमान खान आणि अर्जुन कपूर यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. अरबाज-मलाइकाच्या घटस्फोटासाठी आजही सलमान अर्जुनलाच दोषी मानतो. कधीकाळी दोघांमध्ये चांगली बॉडिंग होती. परंतु आता हे दोघे एकमेकांशी बोलणे पसंत करीत नाहीत. त्याचा प्रत्ययअर्जुनची बहीण सोनमच्या लग्नात आला होता. सोनमच्या रिसेप्शन  पार्टीत जेव्हा सलमान सहभागी झाला होता, तेव्हा त्याने अर्जुनकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्टपणे दिसत होते. काहीकाळापूर्वी मलाइकाला एका मुलाखतीत अर्जुनसोबतच्या नात्याबद्दल विचारले होते. त्याच्या उत्तरात तिने सांगितले होते की, अर्जुन माझा खूप चांगला मित्र आहे. लोक आमच्या नात्याला वेगळ्या दृष्टीतून बघतात, परंतु ते चुकीचे आहे. 
Web Title: Arica Kapoor has forgotten Malaika Arora; Proof of this!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.