गर्लफ्रेंडसोबत अरबाज खान पोहोचला शिल्पा शेट्टीच्या पार्टीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 11:17 AM2018-11-05T11:17:04+5:302018-11-05T11:37:57+5:30

अरबाज खान सध्या गर्लफ्रेंड जॉर्जियासोबत लग्नाच्या चर्चाला घेऊन चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार लवकरच दोघे लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत.

Arbaaz Khan reached the Shilpa Shetty party with the girlfriends | गर्लफ्रेंडसोबत अरबाज खान पोहोचला शिल्पा शेट्टीच्या पार्टीत

गर्लफ्रेंडसोबत अरबाज खान पोहोचला शिल्पा शेट्टीच्या पार्टीत

googlenewsNext
ठळक मुद्देशिल्पा शेट्टीच्या प्री-दिवाळी पार्टी अरबाज आणि जॉर्जिया एकत्र आले होतेअरबाज आणि जॉर्जिया पुढच्या वर्षा कोर्ट मॅरेज करणार आहेत

अरबाज खान सध्या गर्लफ्रेंड जॉर्जियासोबत लग्नाच्या चर्चाला घेऊन चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार लवकरच दोघे लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. नुकताच दोघांचे शिल्पा शेट्टीच्या प्री-दिवाळी पार्टीतले फोटो समोर आला आहेत. या पार्टीत बॉलीवूडचे अनेक कलाकार सामील झाले होते.      


लाल रंगाच्या लहंगामध्ये जॉर्जिया खूपच सुदंर दिसत होती. जॉर्जिया आणि अरबाज एकमेकांसोबत खूपच खुष दिसत होते. अरबाज आणि जॉर्जियामध्ये 22 वर्षांचा फरक आहे. अरबाज 51 आणि जॉर्जिया 29 वर्षांची आहे. स्पॉटब्वॉयच्या रिपोर्टनुसार अरबाज आणि जॉर्जिया पुढच्या वर्षा कोर्ट मॅरेज करणार आहेत. 
सूत्रांच्या माहितीनुसार दोनही कुटुंबीयांनी या नात्याला संमती देखील दिली आहे. त्यामुळे आता हे कपल पुढच्या वर्षीपर्यंत लग्नाच्या बंधनात अडकू शकतो. अरबाज खानला जॉर्जिया एंड्रियानीला बॉलिवूडमध्ये लाँच करायचे आहे. यासाठी त्यांने प्रोफेशनल एजेंसीदेखील हायर केली आहे. यावरुन एक स्पष्ट होतेय की जॉर्जियाला लाँच करण्यासाठी अरबाज खूपच मेहनत घेतो आहे. अर्पिताच्या घरी गणपतीला अरबाज आणि जॉर्जिया एकत्र दिसले होते. अरबाजची पहिली पत्नी मलायका आणि जॉर्जियामध्ये चांगले बॉडिंग आहे.   


अरबाज खान सध्या त्याच्या आगामी ‘दबंग-३’च्या तयारीला लागला आहे. भारतनंतर सलमान दबंगचे शूटिंग करणार आहे. आतापर्यंत आलेले दबंगच्या सिरीज हिट झाल्या आहेत. सलमानच्या अपोझिट कोण झळकणार हे अद्याप कळलेले नाही. मात्र सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट झाल्याचे कळतेय. या सिनेमाच्या सीक्वलचे दिग्दर्शन प्रभूदेवा करणार आहे. याआधी दबंगचे दिग्दर्शन अभिनव कश्यपने केले होते. 'दबंग 2' चे दिग्दर्शन अरबाज खानने केले होते. याचित्रपटातही चुलबुल पांडेची स्टोरी असणार आहे. 

Web Title: Arbaaz Khan reached the Shilpa Shetty party with the girlfriends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.