'Apart' as a comics now | ‘शिवाय’ आता कॉमिक्सच्या रूपात

 

अजय देवगनची प्रमुख भूमिका असलेला ‘शिवाय’ या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन सुरू आहे. अजयने ‘शिवाय’चे प्रमोशन करण्यासाठी कॉमिक्स बुक लाँच करण्याची योजना त्याने आखली आहे. या कॉमिक्समध्ये ‘शिवाय’चे पात्र असले तरी कथा वेगळी असेल. हे कॉमिक्स 23 आॅक्टोंबरला लाँच करण्यात येणार आहे. 

या कॉमिक्समध्ये शिवाय नावाचा गिर्यारोहकाच्या साहस कथा असतील. तो आपल्या शक्ती व कौशल्य व दक्षतेने आपदेवर कसा विजय मिळवितो हे यातून पहायला मिळणार आहे. अजय म्हणतो, सामान्यत: चित्रपट एखाद्या कॉमिक्सवर आधारित असतात. मात्र शिवायचे कॉमिक्स हे चित्रपटावर आधारित असेल. वाचकांना यातून प्रेरणा व नाविण्य मिळणार आहे. विशेष म्हणजे, शिवायचे कॉमिक्स हे चित्रपटाच्या कथेपेक्षा वेगळे असेल. यात नायकाच्या साहसाला व गिर्यारोहणाला वेगळ्या पद्धतीने दाखविण्यात येणार आहे. यामुळे वाचकांना आगळा वेगळा अनुभव येणार आहे. 

शिवायच्या कॉमिक्सची रुपरेषा बेंगलुरूच्या एका कंपनीने साकारली असून यातून ‘हवामान विज्ञाना’ची ओळख होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘शिवाय’ हा चित्रपट दिवाळीमध्ये प्रदर्शित होणार आहे. 


Web Title: 'Apart' as a comics now
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.