सुपरडुपर हिट होणार ‘एबीसीडी 3’! वरूण धवनसोबत अपारशक्ती खुराणाची एन्ट्री!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 09:00 PM2019-01-27T21:00:00+5:302019-01-27T21:00:02+5:30

होय, वरूण व श्रद्धा या चित्रपटात लीड रोलमध्ये आहेत. आता या चित्रपटात आणखी एका शानदार अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. या अभिनेत्याचे नाव आहे, अपारशक्ती खुराणा. 

aparshakti khurrana signs varun dhawan starrer remo dsouzas ABCD3 | सुपरडुपर हिट होणार ‘एबीसीडी 3’! वरूण धवनसोबत अपारशक्ती खुराणाची एन्ट्री!!

सुपरडुपर हिट होणार ‘एबीसीडी 3’! वरूण धवनसोबत अपारशक्ती खुराणाची एन्ट्री!!

googlenewsNext
ठळक मुद्दे‘एबीसीडी 3’ हा बॉलिवूडच्या सर्वाधिक महागड्या चित्रपटांपैकी एक असणार आहे. हा चित्रपट भव्यदिव्य रूपात शूट केला जाणार आहे.

वरूण धवन आणि श्रद्धा कपूर स्टारर ‘एबीसीडी 3’ या आगामी चित्रपटाबद्दल एक धमाकेदार बातमी आहे. होय, वरूण व श्रद्धा या चित्रपटात लीड रोलमध्ये आहेत. आता या चित्रपटात आणखी एका शानदार अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. या अभिनेत्याचे नाव आहे, अपारशक्ती खुराणा. 




ताज्या बातमीनुसार, अपारशक्ती या चित्रपटात एक महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. अपारशक्ती हा अभिनेता आयुष्यमान खुराणाचा भाऊ आहे. अलीकडे रिलीज झालेल्या ‘स्त्री’ या चित्रपटात अपारशक्ती प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसला होता. त्याआधी ‘दंगल’ या चित्रपटात अपारशक्ती दिसला होता. यात त्याने आमिरच्या पुतण्याची भूमिका साकारली होती. या दोन सुपरहिट चित्रपटानंतर   रेमो डिसूजाच्या ‘एबीसीडी 3’मध्ये अपारशक्तीची वर्णी लागली आहे. रेमोचा हा चित्रपट एक डान्स फिल्म आहे. या डान्स फिल्ममध्ये अपारशक्ती कुठल्या अवतारात दिसणार, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे.




‘एबीसीडी 3’ हा बॉलिवूडच्या सर्वाधिक महागड्या चित्रपटांपैकी एक असणार आहे. हा चित्रपट भव्यदिव्य रूपात शूट केला जाणार आहे. प्रेक्षकांसाठी तो 4 डी आणि आयमॅक्स फॉर्मेटमध्ये रिलीज होणार आहे.या चित्रपटाच्या कथेबद्दल फार माहिती समोर आलेली नाही. पण दिग्दर्शक रेमो डिसूजा एक आऊट अ‍ॅण्ड आऊट डान्स फिल्म बनवू इच्छितो. त्यामुळे यात वरुण व श्रद्धाचा कुठलाही रोमॅन्टिक अँगल दाखवण्याच्या त्याचा मूड नाहीये. चित्रपटात पाच  गाणी असणार आहेत. याची कोरिओग्राफी खास असणार आहे. म्हणजेचं, आत्तापर्यंत कधीही पडद्यावर दिसले नाहीत असे काही डान्स मुव्ह्ज यात दिसतील.

Web Title: aparshakti khurrana signs varun dhawan starrer remo dsouzas ABCD3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.