Anything else on publicity stunt? Why did Siddharth Malhotra get 'blackout'? | पब्लिसिटी स्टंट की आणखी काही? सिद्धार्थ मल्होत्राने का केले ‘ब्लॅकआऊट’?

गायक सोनू निगमपाठोपाठ अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा हा सुद्धा ट्विटर सोडतोय?  याचे उत्तर ‘हो’ असेल तर का? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. खरे तर सिद्धार्थ दीर्घकाळापासून सोशल मीडियाशी कनेक्ट आहे. ट्विटरवर त्याचे ६६.२ लाख फॉलोअर्स आहेत. पण सध्या का कुणास ठाऊक पण, सिद्धार्थने आपल्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाऊंटवरचे प्रोफाईल पिक्चर बदलत दोन्हीवरून ‘ब्लॅकआऊट’ केलेयं. दोन्ही अकाऊंटवरचा आपला फोटो हटवून सिद्धार्थने त्याठिकाणी काळ्या रंगाचा प्रोफाईल पिक्चर टाकलायं. इन्स्टाग्रामवरील बायो बदलत त्याठिकाणी त्याने ‘आॅफ’ असे लिहिलेय. ट्विटरवरही ‘सॉरी, आय अ‍ॅम डन’ असे लिहून तो मोकळा झालायं.   यामागचे कारण मात्र त्याने दिलेले नाही. साहजिकच सिद्धार्थने आपली दोन्ही सोशल अकाऊंट अशी ‘ब्लॅकआऊट’ केल्याने त्याच्या चाहत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडालीयं. अचानक असे काय झाले, असा प्रश्न चाहत्यांना पडलायं. त्यामुळेचं लोकांनी एकापाठोपाठ एक अशा अनेक प्रश्नांची जंत्रीच उभी केलीयं. सिद्धार्थने अद्याप यापैकी एकाचेही उत्तर दिलेले नाही. पण कदाचित फॅन वॉरमुळे सिद्धार्थने असे केल्याचे मानले जात आहे.ALSO READ : ​सिद्धार्थ मल्होत्रा नाही तर ‘या’ अभिनेत्यासोबत काम करण्यासाठी उतावीळ झालीय आलिया भट्ट!

काहींच्या मते, हा सिद्धार्थचा पब्लिसिटी स्टंट आहे. लवकरच सिद्धार्थचा ‘अय्यारी’ हा चित्रपट येतोय. या अ‍ॅक्शनपटात सिद्धार्थ एकदम वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात मनोज वाजपेयी हा सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. सिद्धार्थ यात एक आर्मी आॅफिसर साकारणार आहे.
यापूर्वी आलेले सिद्धार्थचे तिन्ही चित्रपट धडाधड आपटले होते. ‘बार बार देखो’, ‘ए जेंटलमॅन’,‘इत्तेफाक’ हे सिद्धार्थचे तिन्ही चित्रपट बॉक्सआॅफिसवर कुठलीच कमाल दाखवू शकले नाहीत. कदाचित यामुळे तर सिद्धार्थने स्वत:ची सोशल अकाऊंट ‘ब्लॅकआऊट’ केली नसतील? आता खरे कारण काय, ते सिद्धार्थला ठाऊक़ पण येत्या काळात सिद्धार्थ पुन्हा सोशल मीडियावर परतलाच तर या ‘ब्लॅकआऊट’चे तो काय कारण देतो, ते ऐकणे इंटरेस्टिंग असणार आहे.
Web Title: Anything else on publicity stunt? Why did Siddharth Malhotra get 'blackout'?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.