का हा दुरावा अनुष्का शर्माचा बॉलिवूडपासून ? खुद्द तिनेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 03:47 PM2019-05-14T15:47:10+5:302019-05-14T15:49:01+5:30

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख सोबत अनुष्का शर्मा झिरोमध्ये पहायला मिळाली. त्यानंतर ती कोणत्याच सिनेमात दिसली नाही आणि सध्या ती कोणत्याच चित्रपटाचे शूटिंगदेखील करत नाही आहे.

anushka-sharma-quit-bollywood-actress-because-virat-kohli-she-reply-first-time- | का हा दुरावा अनुष्का शर्माचा बॉलिवूडपासून ? खुद्द तिनेच केला खुलासा

का हा दुरावा अनुष्का शर्माचा बॉलिवूडपासून ? खुद्द तिनेच केला खुलासा

googlenewsNext

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख सोबत अनुष्का शर्मा झिरोमध्ये पहायला मिळाली. त्यानंतर ती कोणत्याच सिनेमात दिसली नाही आणि सध्या ती कोणत्याच चित्रपटाचे शूटिंगदेखील करत नाही आहे. तसेच अद्याप तिच्या कोणत्याच आगामी प्रोजेक्टबद्दल कोणतेही वृत्त आलेले नाही. त्यामुळे अनुष्का शर्मा सध्या का काम करत नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. या प्रश्नाचे उत्तर नुकतेच अनुष्काने दिले आहे.


हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत अनुष्का म्हणाली की, मी मागील तीन वर्षांपासून फॅशन क्षेत्रात कार्यरत आहे. हे शेड्युल खूप हेक्टिक आहे. या दरम्यान त्याच भूमिका केल्या ज्या जास्त चांगल्या वाटल्या. एका वर्षात परी, सुई धागा, झिरो या चित्रपटात काम केल्यानंतर लगेच दुसरे काम सुरू करणे सोप्पे नाही. मला वाटते की कलाकार म्हणून मी ज्या पोजिशनवर आहे जिथे वेळेसाठी चित्रपट करायचा नाही.


पुढे अनुष्काने सांगितले की, एक निर्माती म्हणून माझ्याकडे खूप प्रोजेक्ट्स आहेत. आम्ही खूप चांगले नियोजन करत आहोत. मी आतापर्यंत जे काम केले त्यासाठी मी खूश आहे.


अनुष्का शर्मा कोणत्या नवीन प्रोजेक्टसोबत कमबॅक करणार याबद्दल खुलासा झालेला नाही. पण, अनुष्का शर्माच्या इंडस्ट्रीतील ब्रेकच्या आधी प्रेग्नेंसीची चर्चादेखील खूप झाली होती. मात्र अनुष्काने ही देखील अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. जर मी प्रेग्नेंट असेन तर ते लपवू शकत नाही, असे ती म्हणाली होती.

सूत्रांच्या माहितीनुसार अनुष्का तिचा नवरा विराट कोहलीसोबत वर्ल्ड टूरवर जाण्याचे प्लानिंग करत आहे. त्यामुळेच तिने अद्याप कोणत्या नवीन प्रोजेक्टला सुरूवात केलेली नाही. 

Web Title: anushka-sharma-quit-bollywood-actress-because-virat-kohli-she-reply-first-time-

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.