Anushka Sharma missing the cricketer's wife! | ​अनुष्का शर्माला मिस करतेय या क्रिकेटपटूची पत्नी!

अनुष्का शर्मा गत २७ डिसेंबरला पती विराट कोहलीसोबत दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना झाली होती. १० दिवस दक्षिण आफ्रिकेत घालवल्यानंतर अनुष्का एकटीच भारतात परतली. पती विराट  कोहली दक्षिण आफ्रिकेसोबत सुरु असलेल्या टेस्ट सीरिजमध्ये बिझी असल्याने अनुष्काला एकटेच मुंबईत परतावे लागले. तिथे दक्षिण आफिक्रेत दहा दिवस अनुष्काने धम्माल मस्ती केली. विशेषत: क्रिकेटपटू शिखर धवनची पत्नी आयशासोबत अनुष्काने बराच क्वालिटी टाईम घालवला. आयशासोबत जिममध्ये एकत्र वर्कआऊट करण्यापासून तर किक्रेटच्या मैदानात भारतीय टीमला एकत्र चीअरअप करण्यापर्यंत सगळे अनुष्काने केले. आता अनुष्का भारतात परतल्यामुळे आयशा तिला मिस करतेय. होय, आयशाने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जे मित्र एकत्र ट्रेनिंग करतात, ते नेहमी सोबत राहतात. आम्ही आमच्या ट्रेनिंग पार्टनर अनुष्काला मिस करू, असे आयशाने अनुष्कासोबतचा एक फोटो शेअर करताना लिहिलेय.भारतात परतताच अनुष्काला आनंद एल राय यांच्या ‘झिरो’ चित्रपटाचे शूटींग पूर्ण करायचे आहे. या चित्रपटात अनुष्कासोबत कॅटरिना कैफ आणि शाहरूख खानही दिसणार आहेत. यंदा २१ डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे. याशिवाय ‘परी’ हा होम प्रॉडक्शनचा चित्रपटही अनुष्काला पूर्ण करायचा आहे. एवढेच नव्हे तर ‘सुई धागा’ या चित्रपटातही अनुष्का बिझी असणार आहे. यात अनुष्का वरूण धवनसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.
विराट व अनुष्का अलीकडे ११ डिसेंबला लग्नबंधनात अडकलेत. विराट आणि अनुष्का या दोघांमध्ये २०१३ पासून अफेअर सुरु होते. एका कमर्शिअलच्या शूटवेळी दोघांचीही भेट झाली होते. अर्थात २०१५ च्या सुरुवातीला दोघांचेही ब्रेकअप झाल्याची बातमी आली होती. मात्र यानंतर मार्च २०१६ मध्ये दोघेही एकत्र दिसले आणि यांच्या प्रेमाच्या चर्चा पुन्हा होऊ लागल्या. गत वर्षी दोघांनीही डेहराडून येथे नाताळ साजरा केला होता. युवराज सिंह व हेजल किच हे दोघे त्यांचे खास अतिथी होते. यावर्षी मे महिन्यात जहिर खान व सागरिका घाटगे यांच्या साखरपुड्याला दोघेही लव्हबर्ड्स एकत्र पोहोचले होते. 
Web Title: Anushka Sharma missing the cricketer's wife!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.